Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: उत्साहवर्धक, संघर्षशील आणि विकासोन्मुख नेतृत्वाचा संगम म्हणजे अरूण धोटे : खा. प्रतिभा धानोरकर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - दीपक शर्मा  राजूरा (दि. ३० सप्टेंबर २०२४) -         राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या वाढदि...


आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
राजूरा (दि. ३० सप्टेंबर २०२४) -
        राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सम्राट सभागृह राजुरा येथे अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लोकप्रिय आमदार सुभाषभाऊ धोटे, प्रमुख अतिथी लोकप्रिय खासदार प्रतिभा धानोरकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, विठ्ठलराव थिपे, माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार, अँड. अरूण धोटे, सभापती विकास देवाळकर, सभापती अशोकराव बावणे, महिला काँ. अध्यक्षा निर्मला कुडमेथे, शहराध्यक्ष संध्या चांदेकर, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, प्रवीण पडवेकर, माजी सभापती कुंदा जेनेकर, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

        यावेळी मार्गदर्शन करताना लोकप्रिय खासदार श्रीमती प्रतिभाताई बाळूभाऊ धानोरकर यांनी सांगितले की, बालपणापासून वडीलाचे छत्र हरल्यावर मोठे बंधू आ. सुभाष धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी स्वकर्तृत्वाने आणि संघर्षातून आपले नेतृत्व सिध्द केले. धोटे कुटुंबात पाच भाऊ असतांनाही ते एकसंघ आहे. कुटुंबात आणि काँग्रेस परिवारात देखील कुठलेही मतभेद नाहीत. अरूणभाऊंनी आपल्या भोवती कार्यकर्तांची मोठी फळी उभी केली. जवळपास ३८ वर्षापासून राजुरा शहराच्या विकासासाठी झटत आहेत. खऱ्या अर्थाने उत्साहवर्धक, संघर्षशील आणि विकासोन्मुख नेतृत्वाचा संगम म्हणजे अरूण धोटे आहेत. त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत रहावी त्यांच्या हातून जनसेवा सतत घडत रहावी असे मत लोकप्रिय खासदार श्रीमती प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले. तर आमदार सुभाष धोटे यांनी सांगितले की माझ्या यशात अरूणभाऊंचा सिंहाचा वाटा राहीलेला आहे. जनतेची अविरत सेवा करून, राजुराचा विकास करून त्यांनी लोकांच्या मनात घर केले आहे. त्यामुळेच लोकांनी त्यांना ५ वेळा नगराध्यक्ष म्हणून निवडून दिले आहे. या पुढेही असेच यश त्यांना मिळावे अशी मनोकामना व्यक्त केली. यावेळी सत्काराला उत्तर देताना माजी नगराध्यक्ष अरुण धोटे म्हणाले की, विद्यार्थीदशेपासुन आपण राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहोत. जनतेची कामे मनापासून केली की लोकं आपल्या सोबत जीवतोडून उभे राहतात याचा मला मागील ४० वर्षापासून अनुभव आहे. आ. सुभाषभाऊंच्या, कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्या आशिर्वादानेच राजुरा शहराच्या विकासासाठी झटता आले हे वास्तव आहे असे मत व्यक्त केले.

           कार्यक्रमाचे प्रास्ताविक काँग्रेसचे जिल्हा महासचिव एजाज अहमद यांनी केले. सुत्रसंचालन सचिन फुलझेले यांनी तर आभार प्रदर्शन यु. काँ. महासचिव प्रणय लांडे यांनी केले. कार्यक्रमाला राजुरा विधानसभा क्षेत्रातील चारही तालुक्यातील काँग्रेसचे जि. प. सदस्य, प. स. सदस्य, न. प. सदस्य, कृ. उ. बा. स. संचालक, सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रा. प. सदस्य, विविध सामाजिक संस्थेचे पदाधिकारी यासह काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजुरा विधानसभा युवक काँग्रेस, राजुरा शहर काँग्रेस च्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.




#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari  #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #kavthala #JivatiTaluka #Mul #Nagbhid #Congress #RajuraAssembly #Formermayor #Exmayor #ArunDhote #birthday #30saptember #MLA #SubhashDhote #MP #PratibhaDhanorkar

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top