सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांच्या नेतृत्वात शेतकरी एकवटले
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. ११ ऑकटोबर २०२४) -
रानडुक्कर, नीलगाय अश्या वन्य प्राण्यांच्या हैदौसामुळे शेतकरी चांगलेच त्रस्त झाले आहे. वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात पिकांची नासधूस करीत असूनही शेतकरी जाचक कायद्यामुळे त्यांच्या बंदोबस्त करू शकत नाही हि वस्तुस्थिती आहे.
मानव जातीप्रमाणे इतरही पशु पक्षांना जीवन जगण्याचा अधिकार आहे. त्यासाठी शासनाने वन्यजीव संरक्षण कायदा तयार केला तो प्रत्यक्षात अमलातही आणला या कायद्यामुळे जंगलातील प्रत्येक जीवाला संरक्षण मिळाले आहे मात्र हा कायदा शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे. वन्यप्राण्यांमुळे शेतकरी असुरक्षित झाले आहेत, या कायद्यामुळे शेत शिवारात शेतकऱ्यांना जाणे कठीण झाले आहे. वन्यप्राणी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटकाही सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे हा प्रकार डोळ्या समोर होत असूनही वन्यप्राणी कायद्यामुळे वन्य प्राण्यांना शेतकरी इजा सुद्धा करू शकत नाही. त्याचा साधा अटकाव सुद्धा करू शकत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी केले ते तहसील कार्यालयासमोरील वन परिक्षेत्र अधिकाराच्या कार्यालयासमोर वन विभागा विरोधात एक दिवसीय धरणे आंदोलनात बोलत होते. परिसरातील शेतकऱ्यांनी या आंदोलनाचे आयोजन केले होते.
⭕ सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्यावर शासकीय कर्मचाऱ्याने केला प्राणघातक हल्ला
⭕ सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्यावर शासकीय कर्मचाऱ्याने केला प्राणघातक हल्ला
सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे पुढे म्हणाले, पेरणी पासून तर पीक हातात येई पर्यंत ग्रामीण भागातील शेतकरी डोळ्यात तेल घालून दिवस रात्र पिकांचे संरक्षण करून पिकांचे संवर्धन करतात. यासाठी शेतकऱ्यांना हजारो रुपये खर्च करावे लागतात, महागडे बियाणे विकत घेऊन पेरणी करावी लागते, महागडे औषधे घेऊन फवारणी करावी लागते, निंदण, डवरणी करावी लागते, प्रचंड परिश्रम घेऊन पिके घेतली जातात. मात्र शेतकरी वन्यप्राण्यांच्या उपद्रवाला रोखण्यास असमर्थ ठरत आहे. त्यामुळे दरवर्षी पिकांचे मोठे नुकसान होत आहे. शेतीच्या कितीही बंदोबस्त केला तरीही उपद्रवी वन्यप्राणी रानडुकरांचा कळप शेतात घुसून पिकांचे नुकसान करीत आहे. प्रशासकीय व्यवस्था अशी आहे कि शासन प्रशासनाला तसेच वन विभागाला शेतकरी मेला तरी चालेल मात्र त्यांचा लाडका रानडुक्कर जगला पाहिजे अशी व्यवस्था बनवून ठेवली आहे. शासन प्रशासनाचा या जाचक कायद्याला बदलण्यासाठी हिवाळी अधिवेशनात जिवती ते नागपूर बैलबंडी मोर्चाही काढण्यात आला होता. जमिनीचे पट्टे असो, रानडुक्करांचा प्रश्न असो, सिंचनाचा प्रश्न असो वा बोगस बी बियाणे असो आम्ही सातत्याने शेतकऱ्यांच्या या गंभीर विषयाकडे गंभीरतेने बघतोय वेळ पडल्यास शासन प्रशासनाला तसेच वन विभागा विरोधात आक्रमक आंदोलन उभारावे लागेल तरी आम्ही मागेपुढे पाहणार नाही असे हि फुसे म्हणाले. आंदोलनानंतर वन विभागाला वन्यप्राणाच्या हैदोसावर आळा घाला या मागणीचे निवेदनही देण्यात आले. आंदोलनात प्रामुख्याने रामदास चौधरी, रामदास धानोरकर, धनंजय बोरडे, सुशील मडावी, भास्कर वांढरे, नारायण भंडारे, सुभाष हजारे, दीपक मडावी व परिसरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #kavthala #JivatiTaluka #Mul #Socialworker #BhushanPhuse #BhushanFuse #BhushanMadhukarraoFuse #kukudsath #pandharpouni #Talodhi #Bakhardi #GadchandurBhoyegaonMarga #ForestDepartment #Dharnamovement #DharnaAandolan #WildBoar #Nilgai #wildanimals #Damagetocrops #oppressivelaw #OfficesofForestZoningAuthority
A-one-day-sit-in-protest-against-the-forest-department-Wild-boar-nilgai-and-wild-animals-are-damaging-the-crops-Farmers-united-under-the-leadership-of-social-activist-Bhushan-Fuse
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.