हाथ रक्त बांबळ ; हाता - पायाला जबर दुखापत
गाडीवर जबर दगडफेक ; गाडीचा काचा फुटल्या
येणारी विधानसभा निवडणूक रक्तरंजित होणार का?
गोंडपिपरी (दि. ११ ऑकटोबर २०२४) -
जसजशी विधानसभा निवडणूक जवळ येत आहे तस-तसे राजकीय वातावरण तापत असून आपआपल्या नेत्यांचे कार्यकर्ते व्हाट्सएप ग्रुपमध्ये एकमेंकांवर आरोप प्रत्यारोपाचे वातावरण निर्माण करत आहे. भाजप, काँग्रेस व शेतकरी संघटनेच्या या प्रस्थापितांच्या गर्दीत सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे हे मागील काही वर्षांपासून सामाजिक कार्यातून जनतेचे सेवक बनले असून शेतकरी, शेतमजूर, कामगार, महिला व विद्यार्थी वर्गात भूषण फुसे लोकप्रिय होत आहे. त्यांच्या या लोकप्रियतेने काही लोकांच्या पोटात दुखत असल्याने राजकीय सूड एके दिवशी कोणी न कोणी उगारणार हे त्यांनाही ठाऊकच होते.
पुलिस ने बरामद किया खतरनाक हथियारों का जखीरा
पुलिस ने बरामद किया खतरनाक हथियारों का जखीरा
आज सकाळी ८ वाजताच्या दरम्यान गोंडपिपरी परिसरात एका अरुंद मार्गावर एका इसमाने मोठ्या दगडाने त्यांच्या गाडीवर दगडफेक केल्याची घटना उजेडात आली आहे. एक इसम मोठा दगड घेऊन फुसे यांच्या गाडीचे काच फोडत असून दुसरा इसम गाडीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे. तिथे उपस्थित काही लोक बघ्यांच्या भूमिकेत असल्याचे ह्या व्हिडिओत दिसून येत असून सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांच्यावर व त्यांच्या गाडीवर हल्ला करणारे कोण हा प्रश्न निर्माण झाला आहे? हा प्राणघातक हल्या भूषण फुसे यांना जिवे मारण्याच्या हेतूने हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांचा मोठा दगड फूसे यांच्या हाताला बसला असून त्यांचे हाथ रक्त बांबड झाले आहे. त्यांच्या हाताला व पायाला जबर दुखापत झाली असून याबाबत पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली आहे.
⭕ पानठेला संचालकांकडून दंड म्हणून हजारो रुपये वसूल करणारे कोण?
⭕ पानठेला संचालकांकडून दंड म्हणून हजारो रुपये वसूल करणारे कोण?
येणारी विधानसभा निवडणूक रक्तरंजित होणार का?
एक सामाजिक कार्यकर्ता या नात्याने भूषण फुसे यांनी सर्वसाधारण लोकांचे कामे न करणाऱ्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांप्रति कठोर पावले उचलली आहे. त्यामुळे सर्वसाधारण लोकांत त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात येत आहे. भूषण फुसे यांच्या लोकाभिमुख कार्यामुळे ते कमी वेळात सर्वसाधारण लोकांत लोकप्रिय झाले असून विरोधकही त्यांच्या डाव करण्याचा बेतात असल्याचे त्यांचा कार्यकर्त्यांनी सांगितले आहे. भूषण फुसे हे त्यांच्या प्रभावी भाषणाने येथील प्रस्थापित भाजप, काँग्रेस व शेतकरी संघटनेवर आसूड टीका करत असून या पार्टीतील लोकांच्या डोळ्यात तर ते खुपसत नाही आहे ना हा प्रश्न निर्माण झाला आहे. भूषण फुसे याना तात्काळ पोलीस संरक्षण देण्याची मागणी होत असून दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
सर्वसाधारण लोकांचे काम न करणाऱ्या, सामान्य लोकांना कार्यालयात चपला घासायला लावणाऱ्या सरकारी नोकरीचा माज आलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भ्याड हल्ल्याला आम्ही घाबरणारे नसून सर्वसाधारण लोकांना वेठीस धरणाऱ्यांना आम्ही त्यांच्याच भाषेत कारवाई करण्यात सज्ज आहोत असा सज्जड इशारा हि भूषण फुसे यांनी दिला आहे. (Will the upcoming assembly elections be bloody?)
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #kavthala #JivatiTaluka #Mul #Socialworker #BhushanPhuse #BhushanFuse #BhushanMadhukarraoFuse #kukudsath #pandharpouni #Talodhi #Bakhardi #GadchandurBhoyegaonMarga #stonethrowing #Assault #AssemblyElections2024 #Whatsappgroup #Farmers #agriculturallabourers #labourers #women #students #BJP #Congress #ShetkariSanghatna
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.