Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: पानठेला संचालकांकडून दंड म्हणून हजारो रुपये वसूल करणारे कोण?
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
दंड वसूल करण्याची पावती सुद्धा नाही? ''डिजिटल इंडिया'' च्या जमान्यात दंडाची रक्कम नगदी स्वरूपात का? सामाजिक कार्यकर्ता भूषण ...
दंड वसूल करण्याची पावती सुद्धा नाही?
''डिजिटल इंडिया'' च्या जमान्यात दंडाची रक्कम नगदी स्वरूपात का?
सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांनी केला भांडाफोड
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
गडचांदूर (दि. १० ऑकटोबर २०२४) -
        तरुणांची धूम्रपानाच्या विळख्यातून सुटका करण्यासाठी रमेशचंद्र यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञ समितीकडून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सूचना मागवल्या होत्या. या समितीने आपल्या अहवालात तंबाखूमुक्तीसाठी कठोर शिफारशी केल्या. आरोग्य मंत्रालयाने या शिफारशी तत्त्वत: स्वीकारल्या. तंबाखूसेवनामुळे होणारे आजार आणि आरोग्याशी संबंधित अन्य समस्यांमुळे होणारे नुकसान थांबवणे हा यामागचा मुख्य हेतू आहे. 

✊ ऐसे ''पढ़ेगा'' तो कैसे आगे ''बढेगा'' भारत

        गडचांदूर परिसरात चार व्यक्ती पानठेल्यावर जाऊन पाचशे, हजार रुपयाचा दंड स्ववसूल करत असल्याची माहिती येथील एका पानठेला संचालकाने सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांना दिली. भूषण फुसे यांनी या चौघांना थांबवून चौकशी केली असता त्या चौघांनी आपले ओळखपत्र दाखविले. यात एक व्यक्ती डेन्सटिस्ट आहे, दुसरा एनसीडी मध्ये ओरल विभागात आहे, एक नर्सिंग कॉलेज चा विद्यार्थी आहे. त्याचा सोबतीला पुन्हा दोघे जण हे पानठेल्यावर जाऊन दंड वसूल करत असल्याचे सांगितले. फुसे यांनी पावती बुक बघितली असता त्यांच्या कडे पावती भूकच नव्हते, एका सध्या पॅड वर दंडाची रक्कम वसूल करणाऱ्याचे नाव व रक्कम लिहून असल्याचे फुसे यांच्या निदर्शनास आले. हे लोक नर्सिंग कॉलेज चा विद्यार्थ्यांच्या खिश्यात वसूल केलेले नगदी रुपये देत होते, एखाद्या वेळेस हा विद्यार्थी पकडल्या गेल्यास त्याचे भविष्याचे काय होईल हाही प्रश्न निर्माण झाला आहे. 
        एका पानठेले वाल्याने दाखविलेल्या जुन्या पावती वर चक्क महाराष्ट्र शासन, सार्वजनिक आरोग्य विभाग, सिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ जाहिरात मनाई आणि व्यापार व वाणिज्य उत्पादन आणि वितरण नियमन कायदा २००३ असे नमूद असून खाली दंड वसूल करणाऱ्याची सही आणि तंबाखू नियंत्रण अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, गडचांदूर असे नमूद आहे. पावती क्रमांक १०९५ वर १००० एक हजार रुपयाचे दंड वसूल केल्याचे नमूद आहे. एका पॅड वर दंड वसूल करणारे भामटे तर नाही ना असा खडा सवाल फुसे यांनी उपस्थित केला आहे. 

💥 आदिवासियों ने सरकार के खिलाफ व्यक्त किया ‘महा आक्रोश’

        एकीकडे देश डिजिटल झाल्याचा पोमाडेंग्या शासन प्रशासन करीत आहे. शासनाला दंड म्हणून रक्कम वसूल करायची असेल तर रीतसर चालान बनवून ट्रेजरीत त्याला दंडाची रक्कम भरायला सांगा. हे असले पावती/पॅडवर रक्कम लिहून जागेवर नगदी वसुली करत बिना भ्रष्ट्राचाराला खतपाणी घालण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाही. कोणत्याही पानठेल्या संचालकाने असल्या लोकांना दंडाची रक्कम देऊन नये, त्याने आयकार्ड दाखविले तरी सुद्धा देऊ नये, दंडाची रक्कम भरायची असेल तर आम्ही ट्रेजरीतच भरू असा आग्रह धरावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांनी केले आहे. याबाबतचे व्हिडीओ सुद्धा सोशल मीडिया वर वायरल होत असून या प्रकरणाचा भांडाफोड करणारे सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांच्या कार्याचे कौतुक करण्यात येत आहे. 

▪️ शिवसेना जिल्हा महिला आघाडी प्रमुख मिनलताई आत्राम यांनी घेतली ''कुटुंब भेट''

        लवकरच आरोग्य व तत्सम विभागाला याबाबत विचारणा केली जाणार असून आता पर्यंत अश्या पॅडवर या विभागाने किती रक्कम वसूल केली याचीही माहिती घेणार असल्याचे फुसे यांनी सांगितले. फुसे यांनी दुकानदारांना विचारणा केली असता दर दिवाळीच्या अगोदर व मार्च एंडिंग मध्ये हे असले लोक येऊन पाचशे हजार रुपये घेत जातात असे सांगितले.  
#panthela #Penalty #Receipt #DigitalIndia #Cash #Socialactivist #BhushanFuse #UnionMinistryofHealth #MinistryofHealth #Gadchandur #DepartmentofPublicHealth #TobaccoControlOfficer #RuralHospital #Gadchandur #shopkeeper

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top