मुलींना लिफ्ट मागून जावे लागत आहे महाविद्यालयात
ग्रामस्थांनी आपल्या समस्या सामाजिक कार्यकर्ते भूषण यांच्याकडे मांडल्या
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
गडचांदूर (दि. १० ऑकटोबर २०२४) -
आपला भारत देश जगाची महासत्ता बनायला चालला आहे, स्पेस टेक्नॉलाजी मध्ये आपण अग्रेसर झालो आहोत, नाल्यांच्या गटारा पासून मोफत गॅस योजना, म्हणे दरवर्षी दोन कोटी रोजगार देणार, १५ लाख खात्यावर देणारी योजना १५०० रुपयात गुंडाळली, अश्या थापा देणाऱ्या केंद्र व राज्य सरकार आपल्या गावापासून शिक्षणाकरिता अवघ्या १५ ते २० किमी लांबी वर असलेल्या शाळेत जायला गावातील विद्यार्थ्यांना बस सुद्धा देऊन शकत नाही हि शोकांतिका व वस्तुस्थिती आहे. कोरपना तालुक्यातील गडचांदूर भोयेगाव मार्गावरील तळोधी (बाखर्डी) येथील विद्यार्थ्यांना शाळेत जायला शाळेच्या वेळेत बसच उपलब्ध नसल्याने शाळकरी मुलांचे विशेषतः मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गडचांदूर भोयेगाव मार्गावरील तळोधी (बाखर्डी) येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी गडचांदूर जावे लागते गावात बस येते पण ती सकाळी ११ वाजताच्या नंतर येत असल्याने शाळकरी मुलांना या बसचा काहीही उपयोग नाही. परिणामी शाळकरी विद्यार्थाना लिफ्ट मांगत शाळेत जावे लागत आहे. सदर बाब गावकऱ्यांनी सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांच्या निदर्शनास आणून दिली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सांगितले कि, त्यांना दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, जीप, कार वेळ आल्यास बैलबंडीने सुद्धा लिफ्ट मागून शाळेत जावे लागत आहे, हीच परिस्थिती येताना सुद्धा आहे. एकीकडे देशात व राज्यात महिला असुरक्षतेचा प्रश्न गंभीर असताना जो पर्यंत आपली मुलगी महाविद्यालयातून वा शाळेतून सुखरूप घरी परत येत नाही तो पर्यंत पालकांचा जीव धाकधुकीत राहतो, असे सांगितले.
सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांच्या नेतृत्वात बस सुरु करण्यासाठी शाळकरी मुलांसोबत गावातील महिलांनी सुद्धा नारेबाजी करत '''भूषण फुसे' यांच्या माध्यमातून राजुरा आगार व्यवस्थापक याना निवेदनही देण्यात आले. तात्काळ बस सुरु न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांनी दिला आहे.
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #kavthala #JivatiTaluka #Mul #Socialworker #BhushanPhuse #BhushanFuse #BhushanMadhukarraoFuse #kukudsath #pandharpouni #Talodhi #Bakhardi #GadchandurBhoyegaonMarga
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.