Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: जनतेसाठी झटणारे काँग्रेसचे प्रामाणिक कार्यकर्ते आ.सुभाष धोटेंना पुन्हा संधी द्या : मुकुल वासनिक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आ.सुभाष धोटेंच्या वाढदिवसानिमित्त भव्य शेतकरी, शेतमजुर, काँग्रेस कार्यकर्ता मेळावा संपन्न आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. १० ऑकटोबर २०२...
आ.सुभाष धोटेंच्या वाढदिवसानिमित्त भव्य शेतकरी, शेतमजुर, काँग्रेस कार्यकर्ता मेळावा संपन्न
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. १० ऑकटोबर २०२४) -
        राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, राजुरा च्या भव्य पटांगणावर दुपारी ठिक १  वाजता भव्य शेतकरी, शेतमजूर व काँग्रेस कार्यकर्ता मेळावा तसेच अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात पार पडला. या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक अ. भा. काँग्रेसचे महासचिव खासदार मुकुल वासनिक, कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर, प्रमुख पाहुणे प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष नाना गावंडे, माजी मंत्री अनिस अहमद, माजी संपादक बाळासाहेब कुलकर्णी, सिनेकलावंत अनिरुद्ध वनकर, दिपक काटोले, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, विनोद दतात्रय, देवराव भांडेकर, सुभाषसिंग गौर, विनायक बांगडे, नंदू नागरकर, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा सुनंदा ढोबे, यु.काँ. जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, सुनीता लोढिया, संगिता अमृतकर, धनश्याम मुलचंदाणी, सतिश वारजुरकर, प्रवीण पडवेकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष संतोष रावत, दिनेश चोखारे, श्रीधरराव गोडे, विजयराव बावणे, प्रा. दिलीप चौधरी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, उत्तमराव पेचे, तुकाराम झाडे, गणपत आडे, विकास देवाळकर, महिला अध्यक्षा निर्मला कुडमेथे, आशा खासरे, सोनू दिवसे, नंदा मुसने यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

✊ ऐसे ''पढ़ेगा'' तो कैसे आगे ''बढेगा'' भारत

        यावेळी उद्घाटनपर मार्गदर्शन करताना अ. भा. काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक म्हणाले की सुभाष धोटे काँग्रेसचे एक प्रामाणिक कार्यकर्ते म्हणून जनतेच्या विकासासाठी संघर्ष करीत आहेत. महाराष्ट्रात एकमेव काँग्रेस खासदार बाळू धानोरकर आणि पून्हा प्रतिभा धानोरकर यांना निवडून आणण्यात, जिल्ह्य़ात काँग्रेसला बळकट करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. आज देशातील शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार, कामगार, महिला, सर्व समाजातील घटक दुःखी, कष्टी आहे. महिलांवर बलात्कार होत असताना सरकार मुग गिळून गप्प आहेत. आज देशाचे संविधान, लोकशाही, धर्म निरपेक्ष संस्कृती संकटात आहेत. त्यामुळे या संकटांना तोंड देण्यासाठी सुभाष धोटे यांना पून्हा संधी द्या त्यांना पुढे व्यापक भुमिका पार पाडायची आहे. ते या क्षेत्राची दशा आणि दिशा सुव्यवस्थीत करण्यात सक्षम आहेत असे मत व्यक्त केले. वाढदिवसाचे अभिष्टचिंतन व सत्काराला उत्तर देताना चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे म्हणाले की, काँग्रेस पक्ष आणि विचारधारा माझ्या नसानसात भिनला असून मी माझ्या श्वासाच्या शेवटच्या क्षणापर्यंत लोकप्रतिनिधी म्हणून क्षेत्रातील जनतेच्या विकासासाठी आयुष्य खर्ची घालणार आहे असा निर्धार व्यक्त केला.


        यावेळी राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी तालुक्यातील तालुका काँग्रेस कमेटी, शहर काँग्रेस, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवादल काँग्रेस, किसान काँग्रेस, ओबीसी काँग्रेस, अनुसूचित जाती विभाग, अनुसूचित जमाती विभाग, अल्पसंख्यांक काँग्रेस, NSUI तथा काँग्रेसचे सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशन तालुका राजुरा, जिवती, कोरपना, गोंडपिपरी चे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी, संचालन सचिन फुलझेले यांनी तर आभार व्यक्त एजाज अहमद यांनी केले.
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari  #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #kavthala #JivatiTaluka #Mul #Birthday #SubhashDhote #MLA #Abhishtchintanceremony #Farmers #farmlaborers #Congressworkers #gather #10October #MahatmaJyotibaPhuleCollegeRajura #MukulWasnik #PratibhaDhanorkar #ArunDhote

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top