आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. ११ ऑकटोबर २०२४) -
भारतीय संस्कृती ही जगात श्रेष्ठ आहे आणि तिच्या श्रेष्ठत्वाचे गमक हे याच विविधतेत आहे. या सर्व संस्कृत्यांची मिळून श्रेष्ठ भारतीय संस्कृती तयार झाली आहे. असे मत उद्धघाटन जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती, काँग्रेस नेते दिनेश दादापाटील चोखारे यांनी व्यक्त केले. आणि सर्वांनी आपल्या भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगायला शिका असा मोलाचा सल्लाही दिला.
घोडपेठ येथे नवरात्र उत्सव दरम्यान दिनांक ०८ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात गावात स्थित १७ शारदा आणि दुर्गा उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच गोंधळ कार्यक्रमाचे उद्धघाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती दिनेश दादापाटील चोखारे यांचेसह ग्रामपंचायतचे उपसरपंच प्रदीप देवगडे, गटनेते ईश्वर निखाडे, ग्रामपंचायत सदस्य ज्योती मोरे, ज्ञानेश्वर घोरपडे, घोडपेठचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजू शेरकी, ग्रामपंचायत सदस्या कविता शेरकी, ग्रामपंचायत सदस्या बोबडेताई, ग्रामपंचायत सदस्या बावणे, निल घोटकर आदींची उपस्थिती होती.
उद्धघाटन प्रसंगी बोलताना ते म्हणाले कि, भारतीय संस्कृती ही जगातील सर्वात प्रसिद्ध संस्कृतींपैकी एक आहे. आपल्या संस्कृतीचा प्राचीन इतिहास उल्लेखनीय आहे आणि तो किमान पाच हजार वर्षांपूर्वीचा आहे. विविध संस्कृतींच्या वैविध्यपूर्ण योगदानामुळे भारतीय परंपरा अद्वितीय आहे. हा भारत आहे जो महान सांस्कृतिक वारसा असलेला एक उल्लेखनीय देश आहे. आपल्या लोकांची पारंपारिक मूल्ये खरोखरच अभूतपूर्व आहेत कारण ती शतकानुशतके पाळली जात आहेत. आपण भारतीय म्हणून आपल्या गौरवशाली वारशाचा आदर केला पाहिजे आणि तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवला पाहिजे. यावेळी गावातील शेकडो ग्रामस्थ, नागरिक, महिला वर्ग उपस्थित होते.
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #kavthala #JivatiTaluka #Mul #Congressleade #DineshChokhare #Ghodpeth #Gondhal #Indianculture #ExchairmanofZillaParishadChandrapur #FinanceandConstructionCommittee #Navratrifestival #GramPanchayat
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.