Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: शेतकरी मेला तरी चालेल मात्र ''लाडका रानडुक्कर'' जगला पाहिजे - भूषण फुसे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वन्यजीव कायदा शेतकऱ्यांच्या जीवावर येतोय का ? रानडुकराने केला शेतकऱ्यांवर जबर हल्ला शेतकरी गंभीर जखमी आमचा विदर्भ - दीपक शर्मा गोंडपिपरी (दि...

वन्यजीव कायदा शेतकऱ्यांच्या जीवावर येतोय का ?
रानडुकराने केला शेतकऱ्यांवर जबर हल्ला
शेतकरी गंभीर जखमी
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
गोंडपिपरी (दि. १२ ऑक्टोबर २०२४) -
        गोंडपिपरी शेतशिवारात शेतात नांदत असताना अचानक रानडुकराने हल्ला केल्याने एक शेतकरी गंभीर झाल्याची घटना नुकतीच गोंडपिपरी शेतशिवार घडली. मिळालेल्या माहितीनुसार गोंडपिपरी तालुक्यातील धामणगाव येथील शेतकरी मोरेश्वर बट्टे शेतात धानाला खत देत असताना अचानक रानडुकराने त्यांच्यावर हल्ला चढविला. स्वतःच्या जीव वाचविण्यासाठी शेतकऱ्याने धावत असताना नालीत पडले त्यात त्यांच्या डाव्या डोळ्याला आणि पायाला गंभीर इजा झाली. आरडाओरड केली असता पत्नी व बाजूच्या शेतकऱ्यांनी धाव घेत रानडुकराला पळवून लावले व शेतकरी मोरेश्वर बट्टे याना ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. आता त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याची माहिती त्यांच्या कुटूंबियांनी सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे याना दिली. गोंडपिपरी येथील ग्रामीण रुग्णालयात फुसे यांनी दि. ११ ऑक्टोबर ला भेट दिली. तेव्हा शेतकरी मोरेश्वर बट्टे यांच्या कुटूंबियांनी फुसे यांची भेट घेत झालेली घटना सांगितली. 

        शेत शिवारात रानटी प्राणी विशेषतः रानडुक्कर येऊन शेतमालाची आतोनात नुकसान करतात. शेतीच्या कितीही बंदोबस्त केला तरीही उपद्रवी वन्यप्राणी रानडुकरांचा कळप शेतात घुसून पिकांचे नुकसान करीत आहे. प्रशासकीय व्यवस्था अशी आहे कि शासन प्रशासनाला तसेच वन विभागाला शेतकरी मेला तरी चालेल मात्र त्यांचा लाडका रानडुक्कर जगला पाहिजे अशी व्यवस्था बनवून ठेवली आहे. शासन प्रशासनाचा या जाचक कायद्याला बदलण्यासाठी हिवाळी अधिवेशनात जिवती ते नागपूर बैलबंडी मोर्चाही काढण्यात आला होता. जमिनीचे पट्टे असो, रानडुक्करांचा प्रश्न असो, सिंचनाचा प्रश्न असो वा बोगस बी बियाणे असो आम्ही सातत्याने शेतकऱ्यांच्या या गंभीर विषयाकडे गंभीरतेने बघतोय वेळ पडल्यास शासन प्रशासनाला तसेच वन विभागा विरोधात आक्रमक आंदोलन उभारावे लागेल तरी आम्ही मागेपुढे पाहणार नाही असे हि फुसे म्हणाले. तुम्हीही शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करत असाल तर ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा.

#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari  #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #kavthala #JivatiTaluka #Mul #Socialworker #BhushanPhuse #BhushanFuse #BhushanMadhukarraoFuse #kukudsath #pandharpouni #Talodhi #Bakhardi #GadchandurBhoyegaonMarga #ForestDepartment #Dharnamovement #DharnaAandolan #WildBoar #Nilgai #wildanimals #Damagetocrops #oppressivelaw #OfficesofForestZoningAuthority #Farmer #wildboar #WildlifeAct #antifarmer #Socialworker #BhushanFuse #government #administration #forestdepartment #radicalmovement #Signal #Gondpipari #ruralhospital #wintersession #Jivati​​toNagpurbullockcartmorcha #bullockcartmorcha #JantakiBaatNews

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top