Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: आ. सुभाष धोटेंनी घेतला कोरपना तालुक्यातील पूर परिस्थितीचा आढावा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अधिकाऱ्यांना तातडीने शासकीय मदत देण्याचे दिले निर्देश आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, प्रतिनिधी कोरपना (दि. ०३ सप्टेंबर २०२४) -         कोरप...
अधिकाऱ्यांना तातडीने शासकीय मदत देण्याचे दिले निर्देश
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, प्रतिनिधी
कोरपना (दि. ०३ सप्टेंबर २०२४) -
        कोरपना तालुक्यातील पैनगंगा नदीच्या बॅक वॉटरमुळे मौजा अंतरगाव, सांगोडा, भोयेगाव, भारोसा आणि परिसरातील शेतीपट्ट्याला जबर भटका बसून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. आमदार सुभाष धोटे यांनी तालुक्यातील अधिकारी, स्थानिक पदाधिकारी व शेतकरी यांना सोबत घेऊन ऐन तान्हा पोळ्याच्या दिवसीच क्षणाचाही विलंब न करता नुकसानग्रस्त शेतपिकांची पाहणी केली, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने शेतीपिकांचे पंचनामे करून झालेली नुकसान भरपाई लवकरात लवकर करण्याचे निर्देश दिलेत.

          यावेळी कोरपनाचे नायब तहसीलदार चिडे, तालुका कृषी अधिकारी ठाकूर, कृषी अधिकारी, तलाठी हिवरकर, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष उत्तमराव पेचे, सुरेश पा. मालेकर, किसन डोंगे, बंडू चौधरी, दिनकर टाले, शालिनी बोंडे, दीपक पाचभाई, प्रमोद पिंपळशेंडे, मंगेश वडस्कर, नितीन पोळे यासह अंतर्गत, सांगोडा, भोयेगाव, भारोसा आणि परिसरातील स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari  #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #kavthala #JivatiTaluka #nanda #korpana #subhashdhote #Tehsildar

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top