गडचांदूरात बचतगट महिला रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. ०३ सप्टेंबर २०२४) -
लोकसभा विस्तारक तथा महाराष्ट्र भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य खुशाल बोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच मित्रागंण बहुउद्देशिय युवा विकास मंच या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा भटक्या विभक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष हितेश चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्ताने लाभार्थ्यांना महिला बचत गटाच्या लाभार्थ्यांना सिलाई मशिनसह अन्य वस्तूंचे वाटप करण्यात आले.
गडचांदुर शहरातील अग्रणी असलेल्या मित्रागंण संस्थेच्या माध्यमातून लक्ष्मी टॉकीज येथे मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना तथा राखी पौर्णिमेच्या औचित्यपूर्ण माध्यमातून बचतगट महिला मेळावा व रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इतर मागासवर्गीय आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहिर, राजुरा विधानसभा क्षेत्रातील लोकाभिमुख नेते माजी आमदार अँड संजय धोटे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य खुशाल बोंडे यांच्या उपस्थितीत मित्रागंण बहुउद्देशिय युवा विकास मंचच्या माध्यमातून आज बचतगट महिला रक्षाबंधन कार्यक्रम सोहळा गडचांदूर येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात कोरपना तालुक्यातील व गडचांदुर शहरातील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते, माताभगिनी आदिची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #kavthala #JivatiTaluka #nanda #mitranganbahuuddeshiyayuvavikasmanch #hansrajahir #sanjaydhote #khushalbonde ##rakshabandhan #hiteshchauhan #gadchandur
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.