आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, प्रतिनिधी
कोरपना (दि. 03 सप्टेंबर 2024) -
कोरपना (दि. 03 सप्टेंबर 2024) -
कोरपना तालुक्यातील नांदा येथे ग्रामपंचायतच्या वतीने गाव विकासाच्या विविध व तंटामुक्त समिती गठन, वन व्यवस्थापन समिती गठन व अन्य विषयावर ग्रामसभा नुकतीच आयोजीत करण्यात आली.
ग्रामसभेला सरपंच मेघा नरेश पेंदोर अध्यक्षस्थानी होत्या तर प्रमुख्याने रत्नाकर चटप, हरीश खंडाळे सर्व ग्रामपचायत सदस्य पोलीस पाटील ग्रामविकास अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामसभेत गावाच्या विविध विकास कामावर चर्चा करुण ठराव मंजुर करण्यात आले. यात महात्मा गांधी गाव तंटामुक्त सामिती अध्यक्ष पदी अविनाश काठे यांची एकमताने निवड करण्यात आली. सोबतच त्यांचे निवडीबद्दल गावकरी जनतेनी समाधान व्यक्त करून अभिनंदन केले. बिनविरोध निवडून आलेले काठे यांची गावातील युवकांनी वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. तबल आठ ते दहा वर्षानंतर प्रथमच ही निवड बिनविरोध झाल्याने गावात आनंदाचे वातावरण दिसून आले.
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #kavthala #JivatiTaluka #nanda #TantamuktCommittee #ForestManagementCommittee #GramSabha #Sarpanch #Villagedevelopment #MahatmaGandhiGaonTantamuktSamiti #President #Choice #Electedunopposed #Procession #ratnakarchatap
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.