Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: सिंधी येथे जिम साहित्य धूळखात
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जिम करिता हॉल बांधून देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी केली धूळखात पडलेल्या साहित्यांची पाहणी राजुरा (दि. ०२ सप्टेंबर २०२४) ...
जिम करिता हॉल बांधून देण्याची मागणी
सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी केली धूळखात पडलेल्या साहित्यांची पाहणी
राजुरा (दि. ०२ सप्टेंबर २०२४) -
        आजकाल जीममध्ये जाऊन भरपूर व्यायाम करणे, तेथील प्रशिक्षकांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आहार घेण्यावर तरुणाई भर देताना दिसते. एखाद्या नायकासारखी आपलीही शरीरयष्टी असावी, असे तरुणांना नेहमीच वाटते. मात्र, प्रत्येकालाच जीममध्ये जाण्यासाठी फी भरणे शक्य नसते. ग्रामीण भागातील युवकांचा कल सुद्धा जिम वळला आहे, व्यायामशाळा विकास अनुदान योजनेतून सिंधी येथे जिम साहित्य देण्यात आले मात्र जिम करिता हॉल, इमारत अथवा खोलीचं नसल्याने सदर जिम साहित्य धूळखात असल्याची बाब समोर आली आहे. 

        राजुरा तालुक्यातील सिंधी येथे जिम साहित्य धूळखात पडून असल्याची बाब गावातील युवकांनी सामाजिक कार्यकर्ते भूषण मधुकरराव फुसे याना सांगितली. सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी गावात भेट देऊन धूळखात पडलेल्या साहित्यांची पाहणी केली. फुसे यांनी सांगितले कि, शासनाने जिम साहित्य तर पुरविले मात्र जागाच नसल्याने जिम साहित्य देऊन गावातील तरुणांना याचा काहीही फायदा झालेला नसून टॅक्स पेयर जनतेच्या पैशाची रांगोळी झालेली दिसत आहे. यातील काही सामान चोरीला गेले असल्याची बाब हि युवकांनी सांगितली. शासनाने त्वरित जिम करिता हॉल बांधून देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी केली असून तात्काळ हॉल करिता निधी मंजूर करून हॉल बनवून न दिल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावेळी गावातील संघर्ष दरेकर, निखिल मत्ते, संघर्ष झुरमुरे, आशिष झुरमुरे, विपुल धानोरकर, स्वप्निल बोबडे, कुणाल वैरागडे, राहुल धानोरकर, मुन्ना बोबडे, कार्तिक बोबडे, प्रज्वल मोरे, पियुष झुरमुरे, रुपेश निखाडे, साईनिकेतन गिनगुुरे, अतुल धानोरकर, अक्षय पिंगे, रितिक आत्राम, आकाश गिनगुरे, हर्ष चहारे, पंकज मोरे, गुणवंत मोरे, अमित झुरमुरे ,अंकित डाहुले, अक्षय मोरे, अमोल चहारे, कुणाल मोरे, रवी ढोके, आकाश धानोरकर, राजू दुर्गे, रामदास घोटेकर, विनीत झुरमुरे, प्रफुल बोबडे, अभय, दिलीप खोके, आर्यन पिंगे, राहुल गौरकार, वैशिक ढुमणे, तेजस पिंगे, सागर ढोके व शेकडो तरुण उपस्थित होते.

#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari  #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #kavthala #JivatiTaluka #janmashtami #dahihandi #dahihandiutsav ##samajikkarykarta #bhushanfuse #bhushanmadhukarraofuse #Gym #Dustoffthegymequipment #Hall #Coach #Exercise #physique #GymnasiumDevelopmentGrantScheme #Gymequipment #FundingfortheHall #sindhi

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top