सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांनी घेतला चिमटा
गोंडपिपरी (दि. ०१ सप्टेंबर २०२४) -
गोंडपिपरी येथे एका राष्ट्रीय पक्षाकडून सामूहिक रक्षाबंधन व महिला सन्मान मेळावा नुकताच पार पडला. भाऊ बहिणींच्या नात्यातील गोडावा वाढविणाऱ्या या पवित्र सणाच्या निमित्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षदर्शी सन्मान मेळावा बाजूला सारत रक्षाबंधनाच्या आड राजकीय पोळी शेकण्यात आली. रक्षाबंधनाच्या निमित्याने भेट्वस्तूचे प्रलोभन दाखविल्यानंतर कार्यक्रमात आलेल्या बहिणींच्या गळ्यात पक्षाचे दुपट्टे टाकून पक्षप्रवेशाचे सोपस्कार पार पडले. राजकीय मेळावे आणि सना निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे फॅड अलीकडे वाढत असून यानिमित्याने भेट्वस्तूचे आमिष आणि रुचकर जेवणापायी अनेकजणांना पक्षाचे दुप्पट्टे घातल्याचा चर्चा होत्या त्यावर आता शिक्कामोर्तब झाले असून दैनिक पुण्यनगरी ला ३० ऑगस्ट रोजी याविषयी बातमी सुद्धा प्रकाशित झाली आहे.
उजव्या हाताला राखी बांधणे धार्मिक दृष्टीकोनातून शुभ
राखी कोणत्या हातावर बांधायची? भावाच्या उजव्या हाताला राखी बांधणे शुभ मानले जाते. शास्त्रानुसार उजवा हात किंवा सरळ हात हा वर्तमान जीवनातील कर्माचा हात मानला जातो. यासोबतच उजव्या हाताने केलेले दान आणि धार्मिक कार्य देव लवकर स्वीकारतो, असेही मानले जाते. उजव्या हाताला राखी बांधणे धार्मिक दृष्टीकोनातून शुभ मानले जाते. त्याचबरोबर आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही याचे अनेक फायदे आहेत. उजव्या हाताला रक्षासूत्र बांधल्याने आजारांपासून दूर राहते. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर शरीराच्या प्रमुख अवयवांपर्यंत पोहोचणाऱ्या नसा मनगटातूनच जातात. अशा स्थितीत या ठिकाणी रक्षासूत्र किंवा राखी बांधल्याने व्यक्तीचा रक्तदाब योग्य राहतो आणि व्यक्तीचा वात, पित्त आणि कफ संतुलित राहतो. अशी हि मान्यता आहे, मात्र राजकीय स्वार्थापायी भाजपचे पाखंडी नेते दोन्ही हाताला राख्या बांधून काय साध्य करू पाहत आहे? हे ढोंग असून असले ढोंग सुज्ञ नागरिक समझले असून यापेक्षा आम्ही मागासवर्गीयच बरे असाहि टोला भूषण भुसे यांनी लगावला आहे.
कार्यक्रमात बोलावलेल्या लाडक्या बहिणींना भेट्वस्तूचे प्रलोभन दाखवत पक्षाचे दुप्पट्टे घालवून १० वर्षांपासून केंद्रात तर ७.५० वर्षांपासून राज्यात सत्तेत असलेल्या पार्टीची अवस्था विकट असल्याचे हे उदाहरण आहे असा चिमटा सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांनी घेतला आहे. सत्ताधारी भाजप असले कार्यक्रम, इव्हेंट व भेट्वस्तूचे आमिष दाखवत भीड जमा करत असेल तरी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्याचा काहीही फायदा होणार नसून याला कारणीभूत भाजपतील तिकीट वाटपानंतर पक्षातील गटबाजीमुळे वरिष्ठ आणि स्थानिक पातळीवरील नेतेच जबाबदार राहणार असल्याचा टोलाही भूषण फुसे यांनी लगावला आहे. भूषण फुसे यांच्या या दूरदृष्टी व्यक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून भाजपतील काही वरिष्ठ कार्यकर्त्यांनीही याला दुजोरा दिला असल्याचे समजते.
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #kavthala #JivatiTaluka #janmashtami #dahihandi #dahihandiutsav ##samajikkarykarta #bhushanfuse #bhushanmadhukarraofuse #Rakshabandhan #ladakibahin #Partyduplicates #bhau #bahin #brothersandsisters #Thelureofthegift #program #pinch #Charity #religiouswork #Shastra #Karma #thewrist #AssemblyElections #Locallevelleaders #NationalParty
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.