Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: भूषण फुसे यांनी घेतली युवा शेतकरी मृतक आकाश पाकुलवार कुटुंबीयांची भेट
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सांत्वन करून केली आपल्यापरीने मदत शासनाची मदत मिळवून देण्याकरिता मदत करण्याचे दिले वचन युवा शेतकरी आकाश पाकुलवार चा वीज पडून नलफडी येथे झाला...
सांत्वन करून केली आपल्यापरीने मदत
शासनाची मदत मिळवून देण्याकरिता मदत करण्याचे दिले वचन
युवा शेतकरी आकाश पाकुलवार चा वीज पडून नलफडी येथे झाला होता मृत्यू
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. ३१ ऑगस्ट २०२४) -
        राजुरा तालुका मुख्यालयापासून १५ किमी अंतरावर असलेल्या नलफडी येथील २७ वर्षीय युवा शेतकरी आकाश कालिदास पाकुलवार याचा शेतात निलगिरी वृक्षाची लागवड करून सर्वांच्या मागाहून घरी परत येत असताना सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २२ ऑगस्ट २०२४ रोजी घडली होती.

        दि. ३१ ऑगस्ट २०२४ रोजी सामाजिक कार्यकर्ते भूषण मधुकरराव फुसे यांनी मृतक युवा शेतकरी आकाश पाकुलवार यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. मृतक युवा शेतकरी आकाश पाकुलवार यांच्या कुटुंबाची परिस्थिती हि खूप हलक्याची आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे होणारे दुर्दैवी निधन, मनाला अस्वस्थ करणार असल्याचे भूषण फुसे यांनी सांगितले. फुसे यांनी कुटुंबाचे सांत्वन करत आपल्यापरीने मदत केली तसेच शासनाकडून तात्काळ जास्तीत जास्त मदत मिळण्यासाठी प्रयत्न करू असे वचन सुद्धा दिले. याबाबतीत मुख्यमंत्र्यांना पत्रही पाठवीत असल्याचे फुसे यांनी सांगितले. या अत्यंत दुःखद प्रसंगी मृतक कुटुंबीयांची भेट घेत असताना सामाजिक कार्यकर्ते भूषण मधुकरराव फुसे यांनी मृतक युवा शेतकरी आकाश पाकुलवार यांचे वडील कालिदास पाकुलवार, आई रेखा कालिदास पाकुलवार, भाऊ अंकित कालिदास पाकुलवार, बहीण अश्विनी कालिदास पाकुलवार आणि प्रियांका कालिदास पाकुलवार यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्या समवेत राकेश चिलकुलवार, बादल कडूकर, नितेश गौरकार, संघर्ष दरेकर व अनेक युवक व महिला उपस्थित होते. 

#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari  #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #kavthala #JivatiTaluka #janmashtami #dahihandi #dahihandiutsav ##samajikkarykarta #bhushanfuse #bhushanmadhukarraofuse #nalfadi #Youngfarmers #Deathbylightning #consolation #help #Governmentassistance #PlantationofEucalyptustree #Unfortunatedeathbylightning #22August2024 #familysituationislight #naturaldisaster #Unfortunatedeathoffarmers #RakeshChilkulwar

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top