आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, प्रतिनिधी
गडचांदूर (दि. ३१ ऑगस्ट २०२४) -
श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त अष्टविनायक गणेश मंडळ गांधी चौक गडचांदूरच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्या सहकार्याने व पुढाकाराने तब्बल नऊ वर्षापासून गडचांदुर शहरात बंद असलेला दहीहंडी उत्सव मोठ्या दिमाखात पार पडला या दहीहंडी उत्सवात शहरातील चार संघांनी सहभाग नोंदविला. यात जय माता दी संघ, सातबारा कोरा संघ, सत्यसेन केवट संघ व फायटर बॉईज संघानी सहभाग घेतला. बोल बजरंगबली कि जय.... गोविंदा आला रे आला..... गाण्याच्या तालावर ठेका घेत गोविंदा पथकांनी मानवी मनोरे रचत दहीहंडी फोडली. यावेळी शेकडो गडचांदूरवासीय उपस्थित होते. यात फायटर बॉय संघाने विजयी दहीहंडी फोडली असून संघा मधून सुरज पांडे व सहकाऱ्यांना सन्मानचिन्ह तथा धनादेश देऊन त्यांच्या सत्कार करण्यात आला.
यात अष्टविनायक गणेश मंडळाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते भूषणजी फुसे यांना सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन त्यांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाचे सदस्य चेतन पांडे, पंकज ईटनकर, रितिक चौधरी, विजय कुळसंगे, निखिल एकरे, वैभव गोरे, सदानंद गिरी व इतर सदस्य तथा शेकडो नागरिक उपस्थित होते.
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #kavthala #JivatiTaluka #janmashtami #dahihandi #dahihandiutsav ##samajikkarykarta #bhushanfuse #bhushanmadhukarraofuse #felicitation #satkar #AshtavinayakGaneshaMandal #gandhichauck #govindaaalareaala
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.