आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, प्रतिनिधी
कोरपना (दि. ०३ सप्टेंबर २०२४) -
तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या प्रसिद्ध औद्योगिक नगरी नांदा येथील टपाल कार्यालयातील संगणक प्रणाली बिघडल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून टपाल कार्यालयाचे कामकाज ठप्प झाले आहे. यामुळे स्थानिक ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक लोकांना बँकिंग, टपाल आणि इतर सेवांशी संबंधित काम करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. टपाल कार्यालयात दररोज अनेक ग्राहक येत असतात, मात्र टपाल विभागाचे अधिकारी कुंभकर्णी झोपेत आहेत. संगणक प्रणालीतील तांत्रिक बिघाडामुळे त्यांचे काम होत नाही. ही समस्या सोडवण्यासाठी टपाल विभागाच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर पावले उचलण्याची गरज आहे जेणेकरून त्रासलेल्या ग्राहकांना दिलासा मिळू शकेल.
संगणकाच्या सीपीयूमध्ये बिघाड झाल्याने १९ ऑगस्टपासून तेथील सर्व व्यवहार व इतर कामे ठप्प झाली होती. मुख्य कार्यालयाने तातडीने सीपीयू दुरुस्त करून पाठविला होता, मात्र तो पुन्हा बिघडल्याने नवीन संगणक प्रणालीची मागणी करण्यात आली. आवारपूर पोस्ट ऑफिसच्या नांदा उपशाखेची टपाल सेवा लवकरच एक-दोन दिवसांत सुरू होईल.रोनित कुमारएस.पी.एम. पोस्ट ऑफिस आवारपूर
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #kavthala #JivatiTaluka #nanda #korpana #postoffice #Workstopped #Customersareconfused #IndustrialCityNanda #Computersystemscrashed #Banking #PostalServices #CPUfailure #SPMPostOfficeAwarpur #Awarpur
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.