आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, प्रतिनिधी
कोरपना (दि. ०४ सप्टेंबर २०२४) -
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर व जिल्हा अमेच्यअर सिलबंम असोसिएशन द्वारा नुकतेच नांदाफाटा येथील श्री शिवाजी इंग्लिश स्कूल तथा ज्यू. कॉलेज येथे जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन प्राचार्य अलेक्झांडरिना डिसूजा, कोरपना तालुका क्रीडा संयोजक प्रमोद वाघाडे प्रमुख अतिथी म्हणुन उपप्राचार्य रत्नाकर चटप, राज्य प्रशिक्षक दुर्गराज रामटेके, सचिव बी.एल करमनकर, मुख्य प्रशिक्षक प्रीतम सोनवणे अमरावती, सचिन अंजीकर नागपूर, क्रिश भोसकर, कुंदन पेंदोर, साम मानकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. सदर प्रशिक्षणात विद्यार्थ्यांना सिलंबम खेळाविषयीची माहिती देण्यात आली. यासोबतच स्वसंरक्षणाविषयीचे धडे सुद्धा देण्यात आले. शालेय जीवनात क्रीडा स्पर्धेचे महत्त्व असुन व्यक्तिगत जीवनासाठी क्रीडा स्पर्धा महत्त्वाच्या असल्याचे मत यावेळी प्रमोद वाघाडे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन दुर्गदास रामटेके यांनी केले यावेळी नागपूर चंद्रपूर गोंडपिंपरी कोरपना राजुरा आदी तालुक्यातील विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग होता विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #Awarpur #kavthala #JivatiTaluka #nanda #korpana #students #DistrictSportsOfficerChandrapur #DistrictAmateurSyllabamAssociation #ShreeShivajiEnglishSchoolandJewCollege #SelfDefenseLessons #Districtlevelworkshop #sportscompetition
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.