Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: शरद जोशी यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
ॲड. वामनराव चटप यांनी केले उदघाटन आमचा विदर्भ - दीपक शर्मा  राजुरा (दि. ०४ सप्टेंबर २०२४) -         शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार यु...
ॲड. वामनराव चटप यांनी केले उदघाटन
आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
राजुरा (दि. ०४ सप्टेंबर २०२४) -
        शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार युगात्मा शरद जोशी यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे दिनांक 3 सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. स्थानिक श्री राम मंदीर सभागृहात झालेल्या रक्तदान शिबीराचे उद्घाटन शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी केले. स्व.शरद जोशी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पन करून रक्तदान शिबीराला सुरूवात झाली. या शिबीरात 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

        यावेळी ॲड. मुरलीधर देवाळकर, निळकंठ कोरांगे, शेषराव बोंडे, दिनकर डोहे, सुभाष रामगिरवार, पंढरी बोंडे, रमेश नळे, प्रभाकर ढवस, सुदर्शन दाचेवार, बंडु देठे, नरेंद्र काकडे, कपील इद्दे, मधुकर चिंचोलकर, भाऊजी कन्नाके, भाऊराव बोबडे, बळीराम खुजे, सुरज गव्हाणे, निखिल बोंडे, सुरज जिवतोडे, पांडूरंग पोटे, समाधान लडके यांचेसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. रक्त संकलनाच्या कार्यासाठी चंद्रपूर जिल्हा सामान्य रूग्णालयातील डाॅ.शिवानी नैनखवाल, गणेश तुपकर, सुनिल पागे, सोनी मेश्राम, दुर्गादास गिरे, विजय कोटावार, रूपेश डहाळे, बिपीन कोडापे, रूपेश घुमे इत्यादींनी सहकार्य केले.


#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari  #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #Awarpur #kavthala #JivatiTaluka #nanda #korpana #SharadJoshiJayanti #Blooddonationcamp #AdvWamanraoChatap #WamanraoChatap #Opening #3September #ShriRamMandir #ChandrapurDistrictGeneralHospital

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top