राजुरा (दि. ०४ सप्टेंबर २०२४) -
रोटरी क्लब राजुराच्या वतीने साईनगर येथील हनुमान मंदिराच्या भव्य पटांगणावर तान्हा पोळा उत्सवांतर्गत नंदीबैल सजावट स्पर्धा घेण्यात आली. तान्हा पोळा हा महाराष्ट्रातील लहान मुलांसाठी महत्त्वाचा सण असून यामध्ये लहान मुलांसोबत त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची सुद्धा महत्त्वाची भूमिका असते. नंदीबैल सजावटीसाठी सर्व कुटुंब मिळून उत्कृष्ट सादरीकरण करण्याचा प्रयत्न करतात. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या मुलांना रोटरी क्लबच्या वतीने बक्षिसांची लय लूट करण्यात आली.
रोटरी क्लबच्या वतीने प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ व पाचवे यामध्ये सायकल, एज्युकेशन किट, टिफिन बॉक्स व वॉटर बॉटल, स्कूल बॅग व स्टडी टेबल अशी बक्षिसे ठेवण्यात आली. त्यामध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस आयांश नगराळे, द्वितीय देवर्ष झाडे, तृतीय अजिंक्य डाहुले, चतुर्थ विहाना चांडक, पाचवे बक्षीस ईशानी पिंपळकर यांना मिळाले.
रोटरी क्लब तान्हा पोळा उत्सव नंदीबैल सजावट स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी रोटरी क्लब राजूराचे अध्यक्ष सारंग गिरसावळे, सचिव निखिल चांडक, कोषाध्यक्ष अभिषेक गंपावार, कमल बजाज, नवल झंवर, साईनगर हनुमान देवस्थानाचे अध्यक्ष संजय गडकरी, प्रकाश रासेकर, आनंदराव ताजने, प्रकाश चौधरी, सदस्य अमजद खान, एड.जीवन इंगोले, डॉ.गजेंद्र अहिरकर, राहुल रासेकर, मयूर बोनगीरवार, अमोल कोंडावार, डॉ.अमोघ कल्लूरवार, स्नेहल झंवर, किशोर हिंगाणे, आनंद चांडक, अजहर शेख, अहमद शेख, राजू गोखरे, विनोद चन्ने, महेंद्र डाखरे, जितेंद्र देशकर, विनोद झंवर, स्वाती गंपावार, पुनम गिरसावळे, वैशाली हिंगाने, दमयंती इंगोले, अर्पणा बजाज, शिल्पा डाहुले, गीतांजली रासेकर, स्नेहा चांडक, प्रणाली खणके, भारती कोंडावार, प्रज्ञा कलुरवार यांनी प्रयत्न केले.
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #Awarpur #kavthala #JivatiTaluka #nanda #korpana #tanhapola #pola #RotaryClub #RotaryClubRajura #Hanumantemple #NandibailDecorationCompetition #NandibailSajavatSpardha #children
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.