Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: तान्हा पोळा म्हणजे शहरी भागातील लोकांना जगाचा पोशिंद्याची आठवण करून देणारा सण : डॉ. मंगेश गुलवाडे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - दीपक शर्मा  चंद्रपूर (दि. ०४ सप्टेंबर २०२४) -         चंद्रपूर येथील स्थानिक गोपालपुरी वार्ड येथे दरवर्षीप्रमाणे पालकमंत्री सु...

आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
चंद्रपूर (दि. ०४ सप्टेंबर २०२४) -
        चंद्रपूर येथील स्थानिक गोपालपुरी वार्ड येथे दरवर्षीप्रमाणे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेप्रमाणे माजी नगरसेवक तथा जिल्हा अध्यक्ष युवा मोर्चा चे विशाल निंबाळकर व बाल केंद्र मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमानाने तान्हा पोळ्याचे आयोजन होत असते. तान्हा पोळा म्हणजे माझ्या शेतकरी राजाचा, बळीराजाचा व महाराष्ट्र संस्कृतीचे दर्शन करून देणारा बालगोपाल पर्यावरण पूरक, सामाजिक संदेश, वेशभूषाने नटून आपल्या नंदीबैल घेऊन या बळीराजाच्या उत्सवात सामील होण्यासाठी लाकडी व मातीचा बैल घेऊन हा आपला श्रावणातील शेवटचा दिवस साजरा करतात. त्यांचा आनंद हा शहरी भागातील ग्रामीण संस्कृतीची आठवण करून देणारी असे प्रतिपादन चंद्रपूरचे सुप्रसिद्ध ENT सर्जन तथा भाजपा माजी महानगर अध्यक्ष भाजपा डॉ. मंगेश गुलवाडे यांनी केले.

       सदर कार्यक्रमाच्या आयोजनाची श्रेय भाजप युवा मोर्चा चे जिल्हा अध्यक्ष विशाल निंबाळकर, वार्डातील ज्येष्ठ नागरिक व बालकेंद्र मित्र परिवारातील सदस्य हजर राहून हा तान्हा पोळ्या चा उत्साह मोठ्या उत्साहात पार पाडून घेतला मान्यवरांच्या हस्ते बालगोपालांना बक्षीस वितरण करण्यात आले.
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari  #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #Awarpur #kavthala #JivatiTaluka #nanda #korpana #gopalpuriward ##gopalpuri #tanhapola #SudhirMungantiwar #DrMangeshGulwade #VishalNimbalkar #farmer #childrens #woodenandclaybull #Shravanmas #Prizedistribution

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top