गडचांदूर (दि. ०४ सप्टेंबर २०२४) -
कोरपना तालुक्यातील भोयगाव जवळील भारोसा येथील एका इसमाचा तान्हा पोळा बघून परतताना नाल्यावरील पुलावरून रस्ता पार करीत असताना पाण्याचा अंदाज न कळल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
चंद्रपूर जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून सर्वत्र पाऊस सुरु असून नदी नाले ओसंडून वाहत आहेत, त्यातच अनेक छोटे मोठे नाले तुडुंब भरले आहे. भारोसा येथील बाळू बारकू तोडासे वय वर्ष अंदाजे ५० असे मृतकाचे नाव असून बाळू हा भोयगाव येथे काल सायंकाळी अंदाजे ५ वाजता भोयेगाव येथील तान्हा पोळा पाहतो आणी नातेवाईकाच्या घरी जातो असे घरच्यांना सांगून घरून निघून गेला. परंतु भोयगाव येथील तान्हा पोळा बघितल्यानंतर नातेवाईकाकडे न जाता त्यांनी गावाचा रस्ता धरला. भोयगाव येथील पानघाटे यांच्या शेताजवळ असलेल्या पुलावर पुराचे पाणी असल्याने त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही व त्यात त्यांचा बुडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी अंदाजे ९ वाजताच्या दरम्यान नाल्यात मृतदेह आढळल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळाली, गडचांदूर पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळ गाठुन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनसाठी गडचांदुर येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. मृतकाच्या मागे एक पत्नी दोन मुले असा आप्त परिवार आहे. पुढील तपास गडचांदूर पोलीस करीत आहे.
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #Awarpur #kavthala #JivatiTaluka #nanda #korpana #Bhoigaon #bharosa #tanhapola #nala #Deathbydrowning #rain #drainsoverflowing #GadchandurPoliceStation #death
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.