विधानसभा निवडणुकीत माजी आमदार सुदर्शन निमकर ठरणार गेमचेंजर?
अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्य शक्ती प्रदर्शन
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. ०५ सप्टेंबर २०२४) -
नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला १ लाख ३० हजारांच्यावर मतदान मिळाले व यात भारतीय कांग्रेस पार्टीच्या उमेदवाराचा २ लाख ६० हजारांच्या वर भारी मतांनी विजय झाला. यात राजुरा विधानसभा क्षेत्रातून काँग्रेसला तब्बल ५८,९०३ एवढ्या फरकाने मताधिक्य यामुळे राजुरा विधानसभा क्षेत्रात आजही काँग्रेस चे पाळेमुळे मजबूत झाले याचे हे प्रमाण आहे, येत्या काही दिवसात विधानसभाच्या निवडणुकींचा बिगूल वाजणार आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत जातीय व सहानुभूती कार्डामुळे शेतकरी संघटनेची मतेही काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या पारड्यात गेली. हे काँग्रेसला मिळालेल्या मताधिक्यावरून लक्षात येते. लोकसभेच्या निवडणुकीत राजुरा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीला ७१ हजार मतदान मिळाले असले तरी या मतदारसंघात भाजपचे साधारणता ५० हजार मतदार आहेत असा अंदाज आहे. आदिवासी मतदारांचा विचार काँग्रेस विचारसरणीचा असल्यामुळे तथा मतदारांनीसुद्धा काँग्रेसला कौल दिल्याचे लक्षात आले.
राजुरा विधानसभेची निवडणूक ही प्रामुख्याने काँग्रेस, भाजप, शेतकरी संघटना, गोंडवाना गणतंत्र पार्टी व वंचितसह इतरही पक्षाचे उमेदवार निवडणूक लढविणार असल्याने ही निवडणूक तिरंगी व चौरंगी होऊन निवडणुकीत रंगत येणार आहे. काँग्रेस पक्षाकडून विद्यमान आमदार सुभाष धोटे उमेदवार असणार आहे. शेतकरी संघटनेकडून वामनराव चटप, मनसेकडून सचिन भोयर, गोंडवाना गणतंत्र पार्टीकडून स्वर्गिय गोदरू पाटील जुमनाके यांचे चिरंजिव जिवती नप चे माजी नगराध्यक्ष गजानन पाटील जुमनाके किंवा त्यांच्या मातोश्री जिप माजी सदस्य तथा विद्यमान नगरसेविका श्रीमती सतलुबाई जुमनाके हया निवडणुक लढविणार असल्याचे बोलल्या जात आहे. आम आदमी पक्षा कडून सुरज ठाकरे उमेदवारी मिळण्याकरिता तयारीत असल्याचे बोलले जाते, मात्र काँग्रेस सोबत आप ची युती झाल्यास त्यांच्या उमेदवारीवर गदा येणार आहे. महत्वाचे म्हणजे मागील तीन वर्षांपासून राजुरा विधानसभा क्षेत्रात मागास्वर्गीयान्मुधून आलेले सामाजिक कार्यातून लोकांत लोकप्रिय झालेले सामाजिक कार्यकर्ते भूषण मधुकरराव फुसे यांचा सुद्धा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे, त्यांच्या रोकठोक कार्यामुळे मागास्वर्गीयांसोबतच व्यापारी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, सर्वसाधारण व महिलासुद्धा त्यांच्या पाठीशी आहे.
मात्र भाजपकडून अजुनपर्यंत कुणाचेही नांव निश्चित नसले तरी राजुरा विधानसभा क्षेत्राकरीता माजी आमदार अँड. संजय धोटे, निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी दिलेले देवराव भोंगळे, माजी आमदार सुदर्शन निमकर व लोकसभा विस्तारक खुशाल बोंडे यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. या मतदार संघातील मागिल निवडणुकांचे अवलोकन केले असता निमकर हे पूर्वाश्रमीचे काँग्रेस पक्षाचे आमदार होते. आजही निमकर यांचा काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संपर्क आहे, २०१४ च्या निवडणुकीत निमकरांनी या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काहीही अस्तित्व नसताना ऐनवेळी घड़ी चिन्ह घेऊन ३० हजार मतदान घेतले, या मतदानात जास्तीत जास्त मतदान हे काँग्रेस विचारसरणीच्या मतदारांनी केल्यामुळे विद्यमान आमदार सुभाष धोटे यांचा २३०० मतांनी पराभव होऊन अँड संजय धोटे विजयी झाले होते. २०१९ च्या निवडणुकीत सुदर्शन निमकर यांनी निवडणूक लढली नाही व झालेल्या भाजपमध्ये प्रवेश केला व तिरंगी लढतीत पुन्हा काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा विजय झाला.
राजुरा विधानसभा मतदारसंघात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला ७१ हजार मतदान मिळाले असले तरी भाजपचे साधारणता ५० हजार मतदार आहेत. सध्यास्थितीत काँग्रेस ७० हजार, शेतकरी संघटना ५० हजार, भाजप ५० हजार गोंगपा ३५ हजार, सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे अंदाजे ५० हजार व इतर मतदार लक्षात घेता सामना अटीतटीचा होणार आहे. यात माजी आमदार निमकर यांना उमेदवारी दिल्यास भाजपचे ५० हजार व निमकरांच्या संपर्कात असलेले साधारणता १५ हजार, काँग्रेसचे मतदार व जातीय समीकरणात वामनराव चटप व सुदर्शन निमकर यांचा धनोजे कुणबी समाजामध्ये असलेल्या दांडग्या जनसंपर्कामुळे, सार्वजनिक कामाची मागणी करून त्यांचा पाठपुरावा करण्याचा हातखंडा निमकरांमध्ये आहे. नुकतेच सिद्धेश्वर मंदीराच्या पुनः निर्माणा करीता सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे माध्यमातून २६ कोटी रु. प्राप्त करवून घेण्यात निमकरांचे प्रयत्न आहे. यामुळे निमकरांच्या पारड्यात सुद्धा लक्षनीय मतदान होण्याची शक्यता असल्याचे मतदारसंघात बोलल्या जात आहे. एकंदरीत विधानसभेच्या निवडणूकीच्या रिंगणात निमकर हे गेमचेंजरची भुमिका बजावण्याची शक्यता आहे. निमकर यांचा वॉट्सएप, फेसबुकवर गाजावाजा न करता दांडगा जनसंपर्क भेटीगाठीच्या माध्यमातून सुरु आहे. पक्षनेतृत्त्व कुणावर या मतदारसंघाची लढाई लढण्याची जबाबदारी देणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
- विशेष कामे -
- दुर्गम आदीवासी बहुल जिवती तालूक्याची निर्मिती निमकरांच्या प्रयत्नामुळे झालामूळे निमकर हे जिवती तालूक्याचे शिल्पकार आहे.
- बंद असलेल्या नक्षलग्रस्त भागाच्या विकासाकरीता असलेला विशेष कृती कार्यक्रम सुरु करण्याचे श्रेय निमकरांना आहे.
- खनिज विकास निधीची सुरुवात निमकरांच्या पाठपुरात्यामूळे झालेली होती.
- अमलमाला धरणाची उंची वाढविल्याचे श्रेय निमकरांनाच जाते.
- भेंडाळा मध्यम सिंचन प्रकल्पाला मंजूरी करण्याचे श्रेय निमकरानाच आहे.
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #Awarpur #kavthala #JivatiTaluka #nanda #korpana #Bhoigaon #bharosa #RajuraAssemblyElection #LokSabhaElections #AssemblyElection #Congress #BJP #ShetkariSanghtna #GobdwanaGantarntraParty #VanchitBahujanAaghadi #PratibhaDhanorkar #SudhirMungantiwar #SubhashDhote #WamanraoChatap #SanjayDhote #AdvSanjayDhote #SudarshanNimkar #DeoravBhongale #KhushalBonde #BushanFuse #BhushanMadhukarraoFuse #SurajThakrey #SachinBhoyer #GajananPatilJumnak #SatlubaiJumnake
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.