Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: चंद्रपूर जिल्ह्यातील ओयो (OYO) आणि हॉटेल्स मध्ये अल्पवयीन मूलांमूलींना प्रवेश बंद करा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदिप चंदनखेडे यांची पोलीस अधिक्षकांकडे मागणी आमचा विदर्भ - दीपक शर्मा चंद्रपूर (दि. ०६ सप्टेंबर २०२४) -         मह...

मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदिप चंदनखेडे यांची पोलीस अधिक्षकांकडे मागणी
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. ०६ सप्टेंबर २०२४) -
        महिलांवर आणि अल्पवयीन मुलीवर होणाऱ्या अत्याचाराने राज्यच नव्हे तर संपूर्ण देश हादरून गेला असुन महिला सुरक्षतेचा खुप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कोलकाता, बदलापूर, तेलंगणातील आसिफाबादच्या थरारक प्रसंगानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपुर, नागभीड येथील महिलांवर झालेल्या घ्रृण कृत्यानी संपूर्ण जिल्ह्यातील महिला भयभीत झाली असून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या या आया-बहिनींना सुरक्षित जीवण कधी येणार असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अल्पवयीन मुलीला चॉकलेट, खाऊ अशा प्रकारचे आमिष दाखवून राक्षसी वृत्तीचे लोक त्यांच्यावर बळजबरी करतात. या प्रकारावर आळा घालण्यासाठी महिला व अल्पवयीन मुलींचा सुरक्षतेसाठी कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. नुकत्याच झालेल्या घटणा या ओयो हाटेल मध्ये घडल्या असुन यावर वेळीच ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे. पोलिसांनी आपल्या स्तरावर जिल्ह्यातील सर्व ओयो हॉटेल्सची चौकशी करून अल्पवयीन मूला-मुलींना प्रवेश बंदी करावी अन्यथा मनसेकडून तीव्र आंदोलन करण्यात येणार असुन याला प्रशासन जबाबदार राहणार या आशयाचे निवेदन मनसेकडून देण्यात आले आहे. 

        चंद्रपूर जिल्हा पोलीस उपअधिक्षक रीना जनबंधू मॅडम यांनी सकारात्मक उत्तर देत सांगितले की, लवकर ही मोहीम सुरू करू अणि कठोर कारवाई करू असे आश्वासनं दिले. मनसेचे जिल्हाध्यक्ष राहूल बालमवार यांच्या मार्गदर्शनात निवेदन देते वेळी मनसेचे जिल्हासचिव किशोर मडगूलवार, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदिप चंदनखेडे, माजी जिल्हा अध्यक्ष सुनिताताई गायकवाड, माजी नगरसेविका सिमाताई रामेडवार, जिल्हा सचिव अर्चना आमटे, बल्लापुर तालुका अध्यक्ष कल्पनाताई पोतर्लावार, अजय अल्लेवार, मंगेश धोटे, विशाल मत्ते, निक्की यादव, अवधुत मेश्राम, उज्वल तेलतुमडे, शुभम वांढरे मनसेचे पदाधिकारी तथा मनसे सैनिक उपस्थित होते.

#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari  #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #Awarpur #kavthala #JivatiTaluka #nanda #korpana #Bhoigaon #bharosa  #OYO #oyohotels #Violenceagainstwomenandminorgirls #SuperintendentofPolice #issueofwomen'ssafety #Kolkata #Badlapur #Asifabad  #Telangana #Ballarpur #Nagbhid #policestation #police #movement #MNS ##RahulBalamwar #kishormadgulwar #kuldipchandankhede #MNSSainik

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top