आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, प्रतिनिधी
कोरपना (दि. २८ सप्टेंबर २०२४) -
कढोली खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचांसह दोन सदस्य अपात्र झाल्यानंतर त्यांच्या अपिलाची 15 दिवसांची मुदत असताना त्यापूर्वी सरपंच निवड सभा घेऊन नवीन सरपंच निवड करण्यात आली होती. त्यामुळे उपसरपंच डॉ. विनायक डोहे यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे तक्रार देऊन कोरपना तहसीलदार यांनी लावलेली सरपंच निवड सभा रद्द करावी तसेच तहसीलदार यांना त्वरित निलंबित करावे अशी मागणी केली होती. या तक्रारीची राज्य शासनाने दखल घेत कोरपना तहसीलदार यांना 27 सप्टेंबर 2024 रोजी निलंबित केले आहे.
डॉ. विनायक विठ्ठलराव डोहे, उपसरपंच कढोली खुर्द यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले होते की, ग्रामपंचायत कढोली खुर्दच्या सरपंच सौ. निर्मला कवडू मरस्कोल्हे आणि सदस्य सौ. सीताबाई पंधरे यांचे सदस्यत्व जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या आदेशानुसार 12 ऑगस्ट 2024 रोजी अपात्र ठरविण्यात आले होते. या आदेशाविरुद्ध विभागीय आयुक्त, नागपूर यांच्याकडे दाद मागण्यासाठी अर्ज करण्यात आला होता. त्यानुसार 26 ऑगस्ट रोजी नागपूर येथे सुनावणीचे पत्र तहसीलदार यांच्यासह संबंधित सर्वाना देण्यात आले होते. तरीही तहसीलदार यांनी 19 ऑगस्टला दिलेल्या आदेशानुसार सरपंच निवडीकरिता 26 ऑगस्ट 2024 रोजी सभा घेतली व काँग्रेसचे उमाजी आत्राम यांची सरपंचपदी निवड केली. अपिलाची मुदत 15 दिवस म्हणजे 27 ऑगस्ट पर्यंत असताना ती संपायच्या आत ही सभा घेण्यात आली. तहसीलदार कोरपना यांनी एकतर्फी आदेश काढून घाईने सभा घेतल्याबद्दल त्यांच्यावर कठोर कारवाई करावी तसेच सदर सरपंच निवड रद्द करावी. अशी मागणी निवेदनाद्वारे केली होती.
शासनाने दखल घेत निलंबणाचे आदेश काढले असून तहसीलदार प्रकाश व्हटकर यांच्याविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा सिस्त अपील नियम १९७९ अन्वये विभागीय चौकशीची कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहे. नियम १९७९च्या नियम ४ (१) अ अन्वये आदेशाच्या दिनांकपासून शासन सेवेतुन निलंबित करण्यात येत असल्याचे आदेश काढण्यात आले. उच्च पदाच्या (high rank) अधिकाऱ्याचे निलंबणाचे आदेश धडकल्याने तहसील कार्यालयातील अधिकऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #kavthala #JivatiTaluka #Mul #Tahasildar #KadholiKhurd #CollectorChandrapur #SelectionofSarpanch #DepartmentalInquiry #SuspendedfromGovernmentService
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.