Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: औद्योगिक राजुरा विधानसभा क्षेत्रातच रोजगाराच्या समस्या
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आजी-माजी लोकप्रतिनिधींनीच्या दुर्लक्षाने स्थानिकांचा रोजगार हिरावला कोरपना येथे सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे बे...

आजी-माजी लोकप्रतिनिधींनीच्या दुर्लक्षाने स्थानिकांचा रोजगार हिरावला
कोरपना येथे सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे बेरोजगारांचा हस्ते उदघाटन
आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
कोरपना (दि. २७ सप्टेंबर २०२४) -
        राजुरा विधानसभा क्षेत्रातील कोरपना तालुका सिमेंट, लाइमस्टोन व आता कोळसा उद्योगा साठी प्रसिद्ध आहे. तालुका औद्योगिक दृष्ट्या भरभराटीस आला असून प्रगत सुद्धा झालाय मात्र येथील बेरोजगार युवकांच्या प्रश्न एरणीवर असून बेरोजगारांची समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तालुक्यात खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणावर असल्याने नामवंत सिमेंट उद्योगाने या तालुक्यात उद्योग सुरु केले आहेत. तालुक्यातील नागरिकांनी आपल्या मुलांना रोजगार मिळेल या उद्देशाने शेती अल्प दरात दिल्या. त्या बदल्यात ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांनाच नोकऱ्या देण्यात आल्या. त्यावेळेस गावकऱ्यांनी कोणताही दुष्परिणाम न लक्षात घेता उद्योगांचे स्वागतच केले. कारखाने सुरू झाले उत्पादनही कोट्यावधीची होऊ लागले मात्र त्याप्रमाणे येथील गावांच्या आणि नागरिकांच्या कुशल कामगार म्हणून नेमण्यास आपला रंग दाखवण्यास सुरुवात केली. तुमच्याकडे कुशल कामगार नाही म्हणत स्थानिक कामगारांना डालवून त्यांच्यावर अकुशल कामगार म्हणून ठपका लावला जातो आणि परप्रांतीयांच्या भरणा केला जातो. हे असले प्रकार तीन दशकापासून सुरु असून स्थानिक आजी माजी लोकप्रतिनिधींनी या गंभीर समस्येकडे गांभीर्याने कधीच लक्ष वेधले नाही वा विधानसभेत मुद्दा उचलून धरला नाही. आजी माजी लोकप्रतिनिधींनी स्थानिक बेरोजगार युवकांना फक्त निवडणुकीच्या वेळेस रोजगाराचे गाजर दाखवत स्वतःची व स्वतःच्या कुटुंबीयांची आर्थिक भरभराटी करून घेतली व स्थानिकांना रोजगारापासून दूर ठेवले असा खळबळजनक गौप्यस्फोट सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांनी केला आहे. 

        दि. २७ सप्टेंबर ला स्थानिक बस स्टॅन्ड चौकात मुख्य मार्गावर सामाजिक कार्यकर्ता भूषण मधुकरराव फुसे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन बेरोजगार युवकांच्या हस्ते करण्यात आले. जनसंपर्क कार्यालय उदघाटन प्रसंगी तृतीयपंथींना सुद्धा आमंत्रित करण्यात आले होते. उपस्थित तृतीयपंथींना मन सन्मान देत फुसे यांनी त्यांच्या आशीर्वादही घेतला. यावेळी बेरोजगार युवकांची वरात काढण्यात आली, वरातीत ''वक्त बदल गया है अब बेटीया नही लडके माँ-बाप पर बोझ है'' अशी हातात स्लोगन बोर्ड घेऊन स्थानिक बेरोजगारांनी वास्तव्य लक्षात आणून दिले. बेरोजगारांची वरात भूषण फुसे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर धडकली. कुशल असो वा अकुशल यानंतर स्थानिक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून न दिल्यास उद्योग सोबतच स्थानिक लोकप्रतिनिधींची हयगय केली जाणार नाही सज्जड इशारा देत या आशयाचे निवेदन फुसे यांनी तहसीलदारांना दिले. यानंतर बेरोजगार युवक, महिला व उपस्थित नागरिकांना फुसे यांनी मार्गदर्शन केले. रोजगाराविषयी भूषण फुसे यांनी सिमेंट उद्योगांसोबतच बेरोजगार युवकांच्या नावावर राजकारण करणाऱ्या आजी माजी लोकप्रनिधींचा समाचार घेतला. आजी माजी लोकप्रनिधींनी वेळीच स्थानिकांना स्थानिकपातळीवर रोजगार देण्याचा प्रश्न विधानसभेत उचलून धरला असता तर येथील युवकांना रोजगारापासून वंचित राहावे लागले नसते व रोजगाराकरिता इकडेतिकडे भटकावे लागले नसते असे म्हटले. यावेळी हजारोंच्या संख्येत जनसमुदाय उपस्थित होता. फुसे यांच्या रोजगाराविषयी खडे बोल बोलल्याने बेरोजगार युवकांमध्ये नवचेतना जागृत झाली असून येणाऱ्या निवडणुकीत बेरोजगार युवक सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांच्या कडे आकृष्ट होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari  #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #kavthala #JivatiTaluka #Mul #Socialworker #BhushanPhuse #BhushanFuse #BhushanMadhukarraoFuse #korpana #jansamparkkaryalay

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top