Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: मतांची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी - भूषण फुसे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
एकीकडे वीजबिल व जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढवायचे व दुसरीकडे बहिणींना मतांसाठी आमिष दाखवायचे आठवडी बाजारात हातात फलक घेऊन वेधले लोकांचे लक्ष ...

एकीकडे वीजबिल व जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढवायचे व दुसरीकडे बहिणींना मतांसाठी आमिष दाखवायचे
आठवडी बाजारात हातात फलक घेऊन वेधले लोकांचे लक्ष - भाजप, काँग्रेस एकाच माळेतील मणी
आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
राजुरा (दि. २९ सप्टेंबर २०२४) -
        लोकसभा निवडणुकीमधील दारूण पराभवानंतर महायुती सरकारने राज्यात विविध योजनांची घोषणा केली आहे. प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना भत्ता  देण्यापासून ते मुलींना मोफत शिक्षण, महिलांना लालपरी मध्ये प्रवास सवलत देण्यापर्यंतच्या योजनांची घोषणा केली आहे. याशिवाय लाडकी बहीण योजनेचीही घोषणा केली आहे. या योजने अंतर्गत महिलांना 1500 रुपये दरमहा देण्यात येत आहेत. काँग्रेसने हि ८ हजार ५०० रुपये दर महिन्याला खटाखट देण्याचे आमिष दिले होते. भाजप, काँग्रेसच्या या योजना निवडणुकीचे आमिषा पर्यंत मर्यादित असून मतांची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी अशी खोचक प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी केली आहे. काँग्रेसचे सुद्धा काही राज्यात सरकार आहे काँग्रेस ने त्यांच्या राज्यात  ८ हजार ५०० रुपये दर महिन्याला खटाखट वाली योजना का नाही सुरू केली असा टोलाही फुसेनीं लगावला. 

        शनिवार २८ सप्टेंबर ला सायंकाळी आठवडी बाजारात सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी मतांची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी असे आठवडी बाजाराच्या दिवशी हातात फलक घेत लोकांचे लक्ष वेधून घेतले. फुसे यांच्याशी व्यावसायिक व लोकांनी सुद्धा संवाद साधला. बाजारात आलेले गिऱ्हाईक व व्यावसायिक हातात फलक घेऊन शांतपणे उभे असलेल्या सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. भूषण फुसे यांच्या कार्यकर्त्यांनी बाजारात जनजागृतीपर पत्रके सुद्धा वाटली. भूषण फुसे यांच्या जनजागृतीपर समाजकार्याने मतदार जागा होत असून येणाऱ्या निवडणुकीत प्रस्थापित नेत्यांचे धाबे दणाणणार आहे एवढे मात्र नक्की.

#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari  #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #kavthala #JivatiTaluka #Mul #Socialworker #BhushanPhuse #BhushanFuse #BhushanMadhukarraoFuse #weeklymarket

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top