Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: शेडवाही येथील सरपंचासह काँग्रेस व भाजप कार्यकर्ते शेतकरी संघटनेत
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जिवती तालुक्यात शेतकरी संघटनेची जोरदार मुसंडी आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. २९ सप्टेंबर २०२४) -         राजुरा विधानसभा क्षेत्रातील ज...
जिवती तालुक्यात शेतकरी संघटनेची जोरदार मुसंडी
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. २९ सप्टेंबर २०२४) -
        राजुरा विधानसभा क्षेत्रातील जीवती तालुक्यातील शेडवाही या आदिवासी व अतिदुर्गम ग्रामपंचायत चे काँग्रेस पक्षाचे सरपंच सित्रूजी सिडाम यांचेसह काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाला रामराम करीत शेतकरी संघटनेचे नेते ॲड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत शेतकरी संघटनेत प्रवेश केला. या सर्व कार्यकर्त्यांचे संघटनेचा लाल बिल्ला लावून माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी स्वागत केले. यावेळी शेडवाही चे सरपंच सित्रू पाटील सिडाम यांचा शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. शेडवाही गुड्यावरील समाजमंदिरात झालेल्या या बैठकीला माजी जि.प. सभापती निळकंठराव कोरांगे, शेख इस्माईल, मधुकर चिंचोलकर, शब्बीर जागीरदार, यांचेसह जीवती तालुक्यातील संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

        या सभेत शेडवाही येथील आमू पाटील सिडाम, हनुमंतू कन्नाके, बारीकराव गेडाम, माणिक सिडाम, माणिक कोहचाळे, चंदू सिडाम, मोतीराम सिडाम, मोतीराम आत्राम, मारोती उदे, बंडू कोडापे, राजू सिडाम, अमृत सोयाम, भिमराव उदे, रामू कुमरे, आनंद परचाके, मोतीराम सिडाम, देवराव गेडाम, भिमराव आत्राम, सोमू कन्नाके, गणपती कुमरे, संभाजी सिडाम यांचेसह अनेक काॅग्रेस व भाजप कार्यकर्त्यांनी शेतकरी संघटनेत प्रवेश केला.

सरपंच सित्रूजी सिडाम यांचे युटर्न
        शेडवाही येथील सरपंच सित्रूजी सिडाम यांनी शेतकरी संघटनेत प्रवेश घेतला होता. याबाबत शेतकरी संघटनेच्या प्रेस नोट ग्रुप मध्ये दि. २१ सप्टेंबर ला प्रेस नोट टाकण्यात आली होती. मात्र दोन दिवसाच्या अंतराने शेडवाही येथील सरपंच सित्रूजी सिडाम यांनी युटर्न घेत पुन्हा काँग्रेस मध्येच राहण्याचा निर्णय घेतल्याचे काँग्रेसच्या प्रसिद्धी प्रमुखा कडून कळविण्यात आले आहे. 



#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari  #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #kavthala #JivatiTaluka #Mul  #Shedwahi #ShetkariSanghtna #Congrass #BJP #AdvWamanraoChatap #WamanraoChatap

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top