Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अखेर राज्यातील आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा पॉलटेक्निक प्रवेशाचा मार्ग मोकळा - आ. सुभाष धोटेंच्या प्रयत्नाला यश
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. २९ सप्टेंबर २०२४) -         आयटीआय चे महासंचालक यांनी विद्यार्थ्यांचे निकाल १५ सप्टेंबर २०२४ रोजी सायंक...

आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. २९ सप्टेंबर २०२४) -
        आयटीआय चे महासंचालक यांनी विद्यार्थ्यांचे निकाल १५ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी १० वाजता जाहीर केला. मात्र तत्पूर्वी दिनांक १३ सप्टेंबर २०२४ ही पॉलटेक्निक प्रवेशाची अंतिम तारीख होती. त्यामुळे राज्यातील हजारो आयटीआय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती निर्माण झाली होती. दरम्यान ही बाब आमदार सुभाष धोटे यांच्या लक्षात येताच त्यांनी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव आणि संचालक यांच्याशी संपर्क साधून सदर पॉलटेक्निक प्रवेश प्रक्रियेची मुदत वाढवून आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी देण्यात यावी अशी मागणी केली.

        अखेर राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव आणि संचालक यांनी सदर गंभीर बाब लक्षात घेऊन आमदार सुभाष धोटे यांच्या मागणीची तातडीने दखल घेऊन पॉलटेक्निक प्रवेश प्रक्रियेची मुदत वाढवीली. यामुळे राज्यातील हजारो आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पॉलटेक्निक प्रवेशाची संधी मिळाली असून आ. सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाने राज्यातील हजारो आयटीआय विद्यार्थी पाँलीटेकनीक शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील झालेत त्यांचे शैक्षणिक नुकसान टळले आहे.

#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari  #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #kavthala #JivatiTaluka #Mul #SubhashDhote #PolytechnicAdmission #Admissionprocess #ITIpassedstudents #students

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top