Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: रेबीज लसीकरण मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - अनंता गोखरे राजुरा (दि. २९ सप्टेंबर २०२४) -          लुईस पाश्चर संशोधकाच्या मृत्यू दिवसानिमित्त रेबीज लसीकरण जगभर साजरा केला ...

आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. २९ सप्टेंबर २०२४) - 
        लुईस पाश्चर संशोधकाच्या मृत्यू दिवसानिमित्त रेबीज लसीकरण जगभर साजरा केला जातो. आजही भारतात पंचवीस हजार लोक रेबीज रोगाला बळी पडून मृत्युमुखी पडतात. चिकीत्सा विज्ञान कितीही प्रगत झालं तरी अद्यापही रेबीज रोगाचा उपचाराच गमक संशोधकाना उमगल नाही. प्रतिबंधात्मक लसीकरण करूनच आपण ह्या रोगाचे समूळ उच्चाटन करू शकतो. केंद्र आणि राज्य शासन याबाबतीत ठोस पावले उचलत आहेत. या दिनाचे औचित्य साधून तालुका राजुरा, जिवती आणि कोरपना अंतर्गत तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय राजुरा येथे  डॉ. मंगेश काळे यांच्या मार्गदर्शनात रेबीज लसीकरण शिबिराचे नियोजन केले. मुख्य अधिकारी नगरपरिषद, राजुरा यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या चमूने सकाळी कार्यालयाच्या आवारात स्वच्छ्ता अभियान घेवून संपूर्ण परिसर स्वच्छ करून निर्जंतुकिरण केले.

        कार्यक्रमाला श्वानप्रेमिंनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यांना तज्ञांनी आवश्यक रेबीज रोगाबाबत माहिती दिली.तसेच त्यांच्या शंकांचे निरसन केले. या कार्यक्रमाला डॉ. मंगेश काळे, जिल्हा पशुसंवर्धन उप आयुक्त, पवन जोंग, उपविभागीय वनअधिकारी राजुरा, डॉ. उमेश हिरुडकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, चंद्रपूर, सहाय्यक आयुक्त डॉ. हरिराम वरठी, चंद्रपुर, डॉ. समिरन सास्तुरकर, आपुलकी फाऊंडेशनच्या संस्थापिका कृतीका सोनटक्के यांनी पाळीव प्राण्याबाबत जनमानसात आपुलकी असावी याबाबत आपली मते मांडली. पवन जोंग यांनी वन्य प्राण्यांना होणाऱ्या रेबीज रोगाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तर डॉ. काळे यांनी रोगाच्या समूळ उच्चाटन करण्याबाबत संदेश दिला. डॉ. हिरूडकर, डॉ. सास्तुरकर, डॉ. वरठी आणि डॉ कांगटे यांनी रेबीज रोगाबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तालुका लघु पशुविद्याकिय सर्व चिकित्सालय, राजुरा येथील सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. सुचिता धांडे यांनी श्वान प्रेमींना रेबीज रोगाचे लसीकरण नियमित विहित वेळेत करण्याबाबत आवाहन केले. सूत्रसंचालन डॉ. आकाश बालबरे यांनी केले. तर आभारप्रदर्शन डॉ.भाग्यश्री बेलसरे यांनी केले. 


#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari  #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #kavthala #JivatiTaluka #Mul #Rabiesvaccination #Veterinary-Hospital-Rajura

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top