Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी धनगर समाजाचे रास्ता रोको आंदोलन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जिवती तालुक्यातील शेणगाव येथे हजारों धनगर उतरले रस्त्यावर आमचा विदर्भ - अनंता गोखरे जिवती (दि. २३ सप्टेंबर २०२४) -         धनगर समाजाच्या ने...
जिवती तालुक्यातील शेणगाव येथे हजारों धनगर उतरले रस्त्यावर
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
जिवती (दि. २३ सप्टेंबर २०२४) -
        धनगर समाजाच्या नेत्यांनी पंढरपूर येथे आदिवासी समाजात धनगर समाजाचा समावेश करण्यासाठी बेमुदत उपोषण केले आणि मुख्यमंत्री यांचे मुख्य सचिव विकास खरगे यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांची कमिटी स्थापन करून धनगड व धनगर हे एकच असल्याचे म्हटले आहे.
मुळात राज्यात धनगड जमात अस्तित्वात नाही जे आहे ते धनगर असल्याचे शपथपत्र सुद्धा शानसांने तीन वेळा मुबंई उच्च न्यायालयाला सादर केलेले आहे. धनगरच्या ऐवजी चुकीने धनगड झाले असल्याने व आताच्या अभ्यास गटाने सुद्धा महाराष्ट्रात धनगड हे धनगर असल्याचे स्पष्ट केले असल्याने आता धनगर जातीला त्वरित अनुसूचित जामातीचे प्रमाणपत्र वाटप करण्यात यावेत या संदर्भात तालुक्यातील मुख्य ठिकाण शेणगाव येथे धनगर समाजातील लोकांनी रास्तारोको आंदोलन केला.

        जिवती पोलीस स्टेशन चे ठाणेदार कांचन पांडे यांच्या मार्फत तहसीलदार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी उपस्थित धनगर समाजाचे वरिष्ठ नेते डॉ. मंगेश गुलवाडे, महेश देवकते, माधव डोईफोडे, शिवाजी श्रीरामे, गोविंद गोरे, रामचंद्र हाके, रामराव शेळके, रमाकांत माने, शंकरराव सोलनकर, खंडेराव सलगर, नामदेव सलगर, दत्ता माने, संग्राम बाजगीर, शिवाजी माने, किशोर चांदुरे, गोविंद केजगीर, व्यँकटी थाडगे, बापूराव गोरे, बालाजी करले, रामचंद्र खटके, विनोद पोले, बालाजी चिटगिरे, मोहन मस्के, प्रकाश पोले, तिरुपती कुंडगीर, तुलसीदास सलगर, सुमनबाई शेळके, अशोक पोले, अण्णासाहेब माने, अरुण थोरात, रामकिसन देवकते, डिंगाबरं ढाले, गणपत सलगर, दीपक हाके, रामचंद्र सलगर, नितेश करे, गणपत सुरणनर, तिरुपती सलगर, गोपीनाथ बोरुळे आदी तसेच ह्जरो धनगर समाजातील महिला व पुरुष उपस्थित होता.

#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari  #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #kavthala #JivatiTaluka #Mul #DrMangeshGulwade #MangeshGulwade #dhangar #dhangarsamaj #aarakshan #DhangarSamajReservation #Shengaon

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top