Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: स्व कर्तृत्वाचा बळावर राजुरा विधानसभा क्षेत्रातील तळागाळातील लोकांसाठी 'भूषण' ठरत आहे फुसे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
भूषण मधुकरराव फुसे: एक सामाजिक योद्धा ; सामाजिक क्षेत्रात उजेड पेरणारा सूर्य.... सामाजिक ते राजकीय : अग्रलेख आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा...
  • भूषण मधुकरराव फुसे: एक सामाजिक योद्धा ; सामाजिक क्षेत्रात उजेड पेरणारा सूर्य....
  • सामाजिक ते राजकीय : अग्रलेख
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. २३ सप्टेंबर २०२४) -
        सामाजिक प्रश्न खरंतर फार महत्वाचे. मात्र त्या प्रश्नांची सोडवणूक करण्याकडेचे नेत्यांचे दुर्लक्ष होतंय. राजकारणातही असे अनेक व्यक्तिमत्व आहेत की ते राजकारणासोबतच सामाजिक प्रश्नाकडे अधिक लक्ष देतात. असाच एक चेहरा राजुरा विधानसभा क्षेत्रात नव्याने पुढे आला आहे. केवळ पुढेच आला नाही तर अंधारलेल्या वस्तीत हा उजेड घेऊन पोहचला आहे. मुक्याचा आवाज झाला आहे. त्यांचा प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरला. भूषण फुसे असे या व्यक्तिमत्वाचे नाव आहे. आपल्या कर्तृत्वाचा बळावर  राजुरा विधानसभा क्षेत्रातील तळागाळातील लोकांसाठी फुसे 'भूषण' ठरत आहे.

व्यक्तिगत परिचय
चंद्रपूरच्या मातीत जन्मलेल्या भूषण मधुकरराव फुसे यांचा प्रवास एका साध्या शेतकरी कुटुंबात सुरू झाला. ०२ ऑगस्ट १९७९ रोजी जन्मलेल्या भूषण यांचे वडील शेतकरी आणि छोटे व्यवसायिक होते, तर आई गृहिणी होती. त्यांच्या शिक्षणाची सुरुवात चंद्रपूरच्या विद्यानिकेतन शाळेत झाली, जिथे त्यांनी १०वी पर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर जनता कॉलेज, चंद्रपूर येथे ज्युनिअर कॉलेज पूर्ण करून, त्यांनी अमरावतीतील गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली. इंजिनिअरिंग नंतर पुणे आणि गुजरातमध्ये नोकरी करत असताना त्यांनी एसबीआयमधून एज्युकेशन लोन घेऊन दिल्लीला एमबीएसाठी प्रवेश घेतला. एमबीए पूर्ण केल्यानंतर त्यांनी फायनान्स आणि शेअर मार्केट क्षेत्रात कार्य केले. शेअर मार्केटमध्ये आपली निपुणता सिद्ध करत २००८ साली स्वतःचा व्यवसाय सुरू केला. आज नवी मुंबईत त्यांचे घर आणि कार्यालय आहे. २०२० साली चंद्रपूरला परत आल्यावर, त्यांनी आपल्या जन्मभूमीवर सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिले आहे.

सामाजिक कार्य आणि आंदोलन
एका अनाथ मुलीला दत्तक घेणे, रस्त्यावरच्या गाईचे पालन पोषण करणे यांसारखी समाजोपयोगी कार्ये त्यांनी हाती घेतली. चंद्रपूरच्या शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा म्हणून कापूस आणि सोयाबीन जाळण्याचा धाडसी निर्णय घेतला. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात बैलबंडी मोर्चा नेला, जिवतीच्या शेतकऱ्यांना जमिनीच्या पट्ट्यांची मागणी केली. भूमिपुत्र स्थानिक बेरोजगार युवकांना डब्लूसीएल, सिमेंट कंपनी आणि खाजगी कंपन्यांमध्ये प्राधान्य मिळावे, यासाठी त्यांनी पंतप्रधान मोदींना अंगातील रक्त काढून पत्र लिहिले. गडचांदूर बस स्थानकासाठी भीक मागून आंदोलन केले आणि नंतर मंडप उभारून त्याला एकनाथ शिंदे बस स्थानक असे नाव दिले. त्यांच्या या धाडसी कृतींमुळे राजकीय व्यवस्थेने पोलिसांवर दबाव आणून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. परंतु, फुसे यांनी जमानत घेण्यास नकार दिला. वेकोलितील खाजगी माती कंपन्यांच्या विरोधात त्यांनी आक्रामक आंदोलन केले, महिला अत्याचाराच्या विरोधात कॅण्डल मार्च काढला. आज त्यांच्या नेतृत्वाखाली राजुरा विधानसभा क्षेत्रातील चारही तालुक्यांत कार्यालये कार्यरत आहेत. जातीवादी आणि धर्मवादी व्यवस्थेविरुद्ध त्यांची लढाई अखंड सुरु आहे. प्रस्थापित राजकारणी आणि पक्षांना धडा शिकवण्याचा त्यांचा मानस आहे. गोंडपिपरी तालुक्यात त्यांनी जनसंवाद यात्रा काढली. तालुक्यात अनेक समस्या त्यांना दिसल्यात. तालुक्यात रोजगाराच्या प्रश्न मोठा आहे. करंजी एमआयडीसी सुरू करण्याकरिता अभिनव आंदोलन फुसे यांनी केले. त्यांचा आंदोलनाला यश आले आहे. बेरोजगारी प्रमाणे तालुक्यातील शिक्षण व्यवस्थापक कोळमळलेली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. घडोली येथील जिल्हा परिषद शाळेतल्या समस्या शासन दरबारी मांडल्या. तसेच घडोली येथील अतिक्रमणाची समस्या सोडवली. ग्रामीण पाणीपुरवठा योजनेत कार्यरत असलेले मुरलीधर येलमुले यांचा तेरा महिन्याचा थकीत पगार शासन प्रशासनाशी पाठपुरावा करून त्यांना त्यांचे पगार मिळवून दिले.‌ ओबीसी यात्रा काढून ओबीसींना परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या अनुच्छेद 340 च्या मार्फत त्यांचे ओबीसी समुदायाला दिलेले न्याय हक्क व मंडल आयोग समजावून दिले. बाबासाहेब आणि संविधानाच्या विचारांवर चालणारे, फुसे हे मानवतावादी, बहुजनवादी, समतावादी, आरक्षणवादी आणि संविधानवादी आहेत. "एक घास आपुलकीचा, एक हात मदतीचा, एक हाक प्रेमाची" या उपक्रमांतर्गत त्यांनी समाजात अनेक उपक्रम राबविले आहेत. भूषण मधुकरराव फुसे यांचे जीवन हे सामाजिक कार्यकर्त्यांसाठी प्रेरणास्थान ठरले आहे.

        धाबा-गोंडपिपरी रस्त्यासाठी गांधीगिरी आंदोलन, शेतकऱ्यांना रान डुकरांपायी होणारा प्रचंड त्रास याकरिता वनविभाग विरोधात भव्य जन आक्रोश शेतकरी मोर्चा, लाईट बिल ची होळी, शाळा बंद करण्याच्या विरोधात मोर्चामध्ये योगदान, धम्म मेळावा, सार्वजनिक अभ्यासिकेला पुस्तक दान व पाण्याच्या कॅन दान केले. गोंडपिपरी बस स्थानक येथे पाणपोई, विधवा महिलेला व परिवाराला आर्थिक सहकार्य, करंजी एमआयडीसी सुरू करण्याकरिता आंदोलन व त्यात यश, आडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतल्या समस्या यशस्वीपणे सोडवल्या, घडोली येथील अतिक्रमणाची समस्या सोडवली, जनसंवाद व जनजागृती यात्रे मार्फत जवळजवळ 70 गावांमध्ये लोकांमध्ये जनजागृती निर्माण करून आत्मविश्वास वाढवला, ओबीसी यात्रा काढून ओबीसींना परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या अनुच्छेद 340 च्या मार्फतत्यांचे ओबीसी समुदायाला दिलेले न्याय हक्क,  व मंडल आयोग समजावून दिले. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध कँडल मार्च मार्च काढून शासनाचे लक्ष वेधले. जिवती तालुक्यातील विजेच्या समस्येवर आक्रामक तोडफोड स्टाईल आंदोलन केले. त्यांच्या जनसेवेचे अभियान हे निरंतर सुरूच असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राजुरा विधानसभा क्षेत्रात भूषण फुसे हे प्रस्थापित राजकारण्यांना घाम फोडत असल्याचे दिसून येत आहे.

#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari  #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #kavthala #JivatiTaluka #Mul #Socialworker #BhushanPhuse #BhushanFuse #BhushanMadhukarraoFuse #RajuraAssemblyConstituency

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top