Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कोमल चन्ने भौतिकशास्त्र विषयात विद्यापीठातून प्रथम
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बी.एससी मधून दहावी मेरिट आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. २३ सप्टेंबर २०२४) -         गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली ने प्राविण्य विद्यार्थ...
बी.एससी मधून दहावी मेरिट
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. २३ सप्टेंबर २०२४) -
        गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली ने प्राविण्य विद्यार्थ्याची यादी प्रसिद्ध केली. आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा ची कोमल चन्ने हिने विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील बी.एससी. मधून दहावी मेरिट आली आहे. तसेच भौतिकशास्त्र विषया मध्ये विद्यापीठातून प्रथम आली आहे. 

        नावलौकिक यश मिळविल्याबद्द्दल तिच्या प्रविण्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुधाकर कुंदोजवार, सचिव अविनाश जाधाव, संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य डॉ. संभाजी वरकड, उपप्राचार्य डॉ.खेराणी, प्रो. डॉ.विशाल दुधे, डॉ.भोंगाडे, डॉ.डांगे, प्रा.शंभरकर, प्रा.सुवर्णा नलगे, प्रा.बोरसरे तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तीचे कौतुक व अभिनंदन केले. कोमल ने आपल्या यशाचे श्रेय प्राचार्य डॉ. संभाजी वरकड, भौतिकशास्त्र विषयाचे प्राध्यापक डॉ.खेरानी, प्रो.डॉ.दुधे व सर्व प्राध्यापकवृंद तसेच आपल्या आई वडीलाना दिले.

#Educational #GondwanaUniversityGadchiroli #Adarsh​​EducationBroadcastingBoardRajura #ShriShivajiCollageRajura #Student #KomalChanne #Rajura

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top