Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: भोयेगाव : वर्धा नदीवर मोठ्या उंचीचा पूल बांधा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पूरग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट आथिर्क पॅकेज द्या भूषण फुसे व शिष्ट मंडळाची निवेदनाद्वारे मागणी कोरपना (दि. २३ सप्टेंबर २०२४) -         कोरपना त...

पूरग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट आथिर्क पॅकेज द्या
भूषण फुसे व शिष्ट मंडळाची निवेदनाद्वारे मागणी
कोरपना (दि. २३ सप्टेंबर २०२४) -
        कोरपना तालुक्यातील गडचांदूरला चंद्रपूरशी जोडणाऱ्या भोयेगाव येथील वर्धा नदीचा पूल कमी उंचीचा असल्यामुळे पावसाळ्यात वर्धा नदीची पाण्याची पातळी थोडीशीही वाढली कि सदर पुलावरून पाणी वाहू लागल्याने या मार्गावरून रहदारी बंद होते. त्यामुळे वाहनचालकांना राजूराहून अधिक अंतर गाठून चंद्रपूरला जावे लागते. कोरपना तालुक्यात मोठ्या चार सिमेंट कंपन्या, कोळसा खाणी व त्यांच्याशी निगडित असल्याने या मार्गावरून वाहतूक खोळंबल्याने त्रास सहन करावा लागतो. याकरिता भोयेगाव वर्धा नदीवर मोठ्या उंचीचा पूल बांधण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. 

        तसेच यावर्षीच्या सततच्या मुसळधार पावसामुळे वर्धा नदीला तीन वेळा पूर आल्याने नदीकाठच्या शेती पाण्यात बुडाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पुरपीडित शेतकऱ्यांना शासनातर्फे कोणतीही मदत मिळालेली नाही. शेतकरी हवालदिन झालेला असून मानसिक रित्या खचला आहे. तसेच अनेक शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्ये कडे प्रवृत्त होत असल्याचे दिसून येत आहे. शासनाने शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक पॅकेज जाहीर करून शेतकऱ्यांचे मनोबल वाढवावे. अश्या आशयाचे निवेदन मुख्यमंत्री, कृषिमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना कोरपना चे तहसीलदार यांच्या मार्फत देण्यात आले. सदर रास्त मागणीला सरकार व प्रशासनाने सकारात्मक प्रदिसाद दिला नाही तर सर्व पीडित सर्व शेतकऱ्यांसोबत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांनी दिला आहे. निवेदन देताना रामदास चौधरी, भोयेगाव, प्रवीण पेंदोर, सामाजिक कार्यकर्ता भूषण मधुकरराव फुसे व सहकारी उपस्थित होते.

#Socialworker #BhushanPhuse #BhushanFuse #BhushanMadhukarraoFuse #chandrapurnews #chandrapurnajtakibaatnews #chandrapurcitynews #chandrapurdistrict #newsbulletin #newstoday #vidarbha #vidarbhanews #maharashtranews #Maharashtra #hindinews #news #breakingnews #newsupdates #Chandrapur #Ballarpur #Ballarshaha #jivati #jiwati #korpana #Chimur #warora #bhadrawati #nagbhir #bramhapuri #neri #sindewahi #mul #rajura #gondpipari #gadchandur #ghugghus #pomburna #nagbhid #wani #savali #chandrapurcrime #chandrapurnews #matamahakali #aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari  #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #kavthala #JivatiTaluka #samajikkarykarta #bhushanfuse #bhushanmadhukarraofuse #Bhoyegaon #WardhaRiver #Farmers 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top