ST बस वर लाडकी बहीण योजनेचे श्रेय घेण्याचे बॅनर मात्र ''चकाचक''
कमिशनच्या हौसेपायी बस स्टॅन्ड तोडून नवीन बस स्टॅन्ड बनवणाऱ्या सरकारची बससेच्या डागडुजीला कात्री - भूषण फुसे
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. २१ सप्टेंबर २०२४) -
मागील जवळपास १० वर्षांपासून कमिशनच्या हौसेपायी चांगल्या स्थितीत असलेले बस स्टॅन्ड पाडून नवीन बस स्टॅन्ड बनविणे, मतांचे राजकारण करण्याकरिता शासनाच्या तिजोरीला विनाकारण आर्थिक बोझा वाढविणाऱ्या योजना राबविणे, असले प्रकार फक्त आपले सरकार राज्यात राहावे म्हणून सरकार राबवित आहे. सरकारने महिलांकरिता एसटी बस प्रवासात अर्ध्या तिकीटाची सोय करून दिली, महिलांना लाडकी बहीण मानणाऱ्या शासनकर्त्यांना आपली बहीण बस मध्ये सुखरूप प्रवास करीत आहे कि नाही हेही ठाऊक नाही. सध्या बहुतांश एसटी बसची अवस्था अत्यंत दयनीय झालेली दिसून येत आहे. एसटी बस चे वरच्या टपावर ताडपत्री लावून बस चालवत असल्याचे व्हिडीओ सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांनी सोशल मीडियावर टाकले आहे. भूषण फुसे यांनी सरकारच्या खोट्या योजनेला बळी न पडता या सरकारला खाली पाडण्याचे आवाहन केले आहे. या व्हिडिओत बघू शकता एसटी बसला ताडपत्री लागली आहे, जागोजागी डागडुजी आहे, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचे फोटो असलेले बॅनर मात्र चांगल्या अवस्थेत आहे.
बसचे छत चक्क हवेत उडालयाची चित्रफित झाली होती वायरल
काही दिवसांपूर्वी गडचिरोली - अहेरी मार्गावर एका बसचे छत चक्क हवेत उडाल्याचा व्हिडीओ समाज माध्यमात वायरल झाला होता. तरी देखील महामंडळांने बसेस ची दुर्दशा आजपावेतो न सुधरवता वायरल व्हिडीओ ची दाखल म्हणून अभियंत्यांवर नाहक कारवाई करत स्वतःची पाठ थोपवून घेतली होती. तसेच अहेरी आगाराच्या बसमध्ये सुद्धा भर पावसात चालक एका हातात स्टिअरिंग तर दुसऱ्या हाताने वायपर फिरवत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. खिळखिळ्या बसेसची वाट कठीण असून प्रवाश्याना हाल अपेष्टा सहन करत प्रवास करावा लागत आहे.
#Gadchiroli #Socialworker #BhushanPhuse #BhushanFuse #BhushanMadhukarraoFuse #jantakibaat #jantakibaatchandrapur #jantakibaattoday #expressnewstoday #chandrapurnewsbulletin #chandrapurupdateslive #vidarbhaupdates #maharashtranews #jantakibaatewschandrapurbulletin #jankakibaatrajura #jantakibaatballarshah #chandrapurnews #chandrapurnajtakibaatnews #chandrapurcitynews #chandrapurdistrict #newsbulletin #newstoday #vidarbha #vidarbhanews #maharashtranews #Maharashtra #hindinews #news #breakingnews #newsupdates #Chandrapur #Ballarpur #Ballarshaha #jivati #jiwati #korpana #Chimur #warora #bhadrawati #nagbhir #bramhapuri #neri #sindewahi #mul #rajura #gondpipari #gadchandur #ghugghus #pomburna #nagbhid #wani #savali #chandrapurcrime #chandrapurnews #matamahakali #jantakibaatnews #bhushanfuse #stbus #stbusnews #chandrapur #chandrapurcitynews #chandrapurcitynews #vidarbhanews
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.