आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. १९ सप्टेंबर २०२४) -
मुल गावापासून तीन किमी अंतरावर असलेल्या शेतशिवाराच्या परिसरात गुरे आणि शेळयांना चारा चारण्यासाठी गेलेल्या गुराख्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची दुर्दैवी घटना काटवन बिटच्या बफर झोन कम्पार्टमेंट नंबर ७५६ मध्ये गुरूवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या दरम्यान चिचोली येथे घडली.
या घटनेने गावात खळबळ उडाली असून मूल तालुक्यातील दोन महिन्यातील ही सहावी घटना आहे. मृतक गुराख्याचे नाव देवाजी वारलू राऊत वय ६५ वर्षे रा. चिचोली असे आहे. मूदेवाजी राऊत यांना चिचोली येथे शेती आहे. शेती करण्यासोबत ते गावातील गुरे आणि शेळया राखण्याचे काम करतात. सदर परिसर झुडपी जंगलाचा असून त्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने देवाजी राऊत यांच्यावर हल्ला केला. फरफरट नेऊन त्यांना जागीच ठार केले, त्यांच्या सोबत असलेले गुराखी भाऊजी नेवारे यांनी गावात येऊन घटना सांगितली. तात्काळ बफर झोनच्या वनविभागाला माहिती देण्यात आली. झुडपी जंगलात देवाजी यांचा मृतदेह आढळून आला. पंचनामा करून त्यांचा मृतदेह मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. घटनास्थळी बफर झोनचे वनपरिक्षेत्राधिकारी राहूल कारेकर, पोलिस निरिक्षक सुमीत परतेकी, क्षेत्र सहायक गजानन वरगंटीवार, वनरक्षक बंडू परचाके यांनी भेट दिली.
मूल तालुक्यातील ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील ही सहावी घटना असून वाघाच्या वाढत्या हल्ल्यामुळे शेतकरी, शेतमजूर आणि गुराख्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहचत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून वनविभागाने तात्काळ वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #kavthala #JivatiTaluka #Mul #Killedtigerattack #cowherd #tigerattack #tiger #Katwanbit #agriculture #Cattle #goats #deadbody #XUpazilaHospitalMool #Forestarea #PoliceInspector #FieldAssistant #forestguard #ForestRangeOfficer
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.