गोंडपिपरी येथे सहयोग लोकसंचालित साधन केंद्राची १३ वी सर्वसाधारण सभा संपन्न
सभेत ३४ गावातील २७० गटातील चार हजाराच्यावर महिला उपस्थित
गोंडपिपरी (दि. २९ ऑगस्ट २०२४) -
आर्थिक प्रगती साधायला शिक्षणाची गरज नसते, इतिहासात आणि समाजात असे कित्येक उदाहरण आपण पाहत असतो कि कधीही शाळेत न गेलेले वा कमी शिकलेले लोकही व्यवसायात, उद्योगात, शेती व शेतीच्या जोडधंद्यात आर्थिक प्रगती करून आत्मनिर्भर जीवन जगतात. लिज्जत पापड बनवणाऱ्या महिलांनी एकत्र येत पापड व्यवसायाला सुरुवात केली त्या महिला शिकलेल्या नव्हत्या मात्र त्यांनी आर्थिक प्रगती साध्य केली, सर्वसाधारण महिलांनी अबला नाही तर सबला म्हणून कार्य करावे, राजनीतिक पार्टीच्या पैसे वाटप योजनेत अधिक लक्ष न देता आपण स्वबळावर काय करू शकतो याकडे लक्ष केंद्रित करावे, आर्थिक स्वावलंबन प्रशिक्षणाच्या लाभ घेऊन कुटुंबाची आर्थिक प्रगती कशी करता येईल याकडे लक्ष देण्याचे प्रयत्न करावे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते भूषण मधुकरराव फुसे यांनी केले ते गोंडपिपरी येथे सहयोग लोकसंचालित साधन केंद्राच्या १३ व्या सर्वसाधारण सभेत बोलत होते.
गोंडपिपरी येथे सहयोग लोकसंचालित साधन केंद्राची १३ वी सर्वसाधारण सभेचे आयोजन खैरे कुणबी समाज सभागृहात बुधवार दि. २८ ऑगस्ट ला करण्यात आले होते. या सभेत ३४ गावातील २७० गटातील चार हजाराच्यावर महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे उदघाटन सामाजिक कार्यकर्ते भूषण मधुकरराव फुसे यांचे हस्ते करण्यात आले होते.
या देशात महिला आणि मुलींची सुरक्षा हा फार गंभीर विषय झाला आहे, या देशाची शोकांतिका आहे या देशात प्रत्येक घरात देवीची पूजा अर्चना होते, देशातील लाखो मंडळं देवीची मूर्ती बसवून पूजा करतात त्याच देशात महिलां व मुलींवर अत्याचार होतंय हे या देशाचे फार मोठे दुर्दैव आहे, निंदनीय आहे. महिलांनी आर्थिक प्रगती सोबतच सेल्फ डिफेन्स चे सुद्धा प्रशिक्षण घ्यावे जेणेकरून महिलांकडे डोळे वटारून बघणाऱ्यांचे डोळे काढण्याची ताकत तुम्ही महिलांच्या मनगुटात असली पाहिजे असेही भूषण मधुकरराव फुसे म्हणाले.
यावेळी गोंडपिपरी येथील सहयोग लोकसंचालित साधन केंद्राच्या अध्यक्षा शालिनीताई गुलाब कांबळे, मार्गदर्शक म्हणून चंद्रपूर महिला आर्थिक विकास महामंडळ चे जिल्हा समन्वयक प्रदीप काठोळे, चंद्रपूर बँक ऑफ इंडिया जिल्हा व्यवस्थापक राजू नंदवनवार अग्रणी, महात्मा फुले विकास महामंडळ चंद्रपूर चे जिल्हा व्यवस्थापक महानंदा नेते, गोंडपिपरीतील तालुका कृषी अधिकारी सचिन पानसरे, गोंडपिपरी बाल विकास प्रकल्प अधिकारी गीता केकान, प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्षा सविताताई कुळमेथे, गोंडपिपरी बँक ऑफ इंडिया शाखा व्यवस्थापक सारंग लेकुरवाडे, गोंडपिपरी सहयोग लोकसंचालित साधन केंद्राचे सचिव निर्मला निमगडे, गोंडपिपरी सहयोग लोकसंचालित साधन केंद्र उपाध्यक्ष ताईबाई झाडे तसेच गोंडपिपरी व परिसरातील गणमान्य व्यक्ती, चार हजाराच्यावर महिला उपस्थित होत्या.
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #kavthala #nagbhid #jiwati #bhari #patan #shedwahi #babapur #shankarpathar #jiwati #jiwatitahasil #nagrala #farmer #gondpipari #BhushanMadhukarraoPhuse #BhushanMadhukarraoFuse #BhushanPhuse #BhushanFuse #Sahyogloksanchalitsadhankendra #aamsabha #generalmeeting #Womans #wealthdistributionplan #selfdefensetraining #economicprogress
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.