Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: शेतकऱ्यांना सरसकट प्रोत्साहन अनुदान सहाय्य द्या
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कोरपना तालुका भाजपा च्या वतीने मागणी पीक पाहणी न केलेल्या शेतकऱ्यांना या अर्थसहाय्यापासून वंचित राहण्याची पाळी आमचा विदर्भ - दीपक शर्मा कोरप...

कोरपना तालुका भाजपा च्या वतीने मागणी
पीक पाहणी न केलेल्या शेतकऱ्यांना या अर्थसहाय्यापासून वंचित राहण्याची पाळी
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
कोरपना (दि. २७ ऑगस्ट २०२४) -
        ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीन प्रोत्साहन अनुदान देण्यात येत आहे. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली नाही. त्यामुळे त्यांचे यादीत नाव आले नाही. त्यामुळे या अर्थसहाय्य पासून शेतकरी वंचित राहणार आहे. या दृष्टीने शासनाने सरसकट संपूर्ण शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान द्यावे या मागणीचे निवेदन तालुका कृषी अधिकारी कोरपना मार्फत शासनाला भारतीय जनता पार्टी तालुका कोरपना च्या वतीने देण्यात आले.

        सन २०२२-२०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे शेतमालांना भाव मिळू शकला नाही. त्यामुळे शासनातर्फे शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पाच हजार रुपये प्रोत्साहन अनुदान म्हणून दिले जाणार आहे. यात पात्र शेतकऱ्याची यादी जाहीर झाली. परंतु पीक पाहणी न केलेल्या शेतकऱ्यांना या अर्थसहाय्यापासून वंचित राहण्याची पाळी आली आहे. ही बाब लक्षात घेता संपूर्ण शेतकऱ्यांना सरसकट अनुदान देण्यात यावे अशी अपेक्षा निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली. याप्रसंगी निवेदन देतेवेळीभारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष संजय मुसळे, महामंत्री सतीश उपलेंचीवार, विजय रणदिवे, किशोर बावणे, अरुण डोहे, शशिकांत आडकिने, विशाल गजलवार, संजय पिंपळशेंडे, निखिल भोंगळे, अरविंद तिरनकर, आबाजी बोबडे, मालेकर आदी सह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari  #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #kavthala #nagbhid #jiwati #bhari #patan #shedwahi #babapur #shankarpathar #jiwati #jiwatitahasil #nagrala #farmer #Ecropinspection #BJP #korpanaTaluka #Cotton #soybeans #financialassistance #TalukaAgricultureOfficerKorpana #Government #grant

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top