अनुसूचित जाती जनजातीत वर्गीकरण करून आरक्षण संपविण्याचा मोदी सरकारचे षडयंत्र
राजुरा, कोरपना, जिवती, गोंडपिपरी तालुक्यात एक दिवसीय तालुका निहाय धरणे आंदोलन
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
जिवती (दि. २९ ऑगस्ट २०२४) -
आदिवासी समन्वय समिती तर्फे आदिवासी समुदायातील विविध मागण्यांकरिता राजुरा, कोरपना, जिवती, गोंडपिपरी तालुक्यात एक दिवसीय तालुका निहाय धरणे आंदोलन २७ ऑगस्ट ते २ सप्टेंबर पर्यंत वरील तहसील कार्यालयाच्या गेट जवळ करण्यात येत आहे. २७ ऑगस्ट ला राजुरा तहसील कार्यालयाच्या गेट जवळ आंदोलन करण्यात आले. आज दि. २९ ऑगस्ट ला जिवती येथे एक दिवसीय तालुका निहाय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते भूषण मधुकरराव फुसे यांनी पुढाकार घेत मोदी सरकार व प्रशासनाला धारेवर धरले.
जिवती येथे आंदोलनाला भेट देत सामाजिक कार्यकर्ते भूषण मधुकरराव फुसे यांनी म्हटले कि, मोदी सरकार व शासनाने बोगस जात प्रमाणपत्र देऊन इतर समाजाला आदिवासींमधलं जे आरक्षण दिल आहे या सर्व प्रकरणात ज्यांनी असे जात प्रमाणपत्र दिले आणि ज्यांनी घेतले यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली. तसेच असे खोटे जात प्रमाणपत्र देणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्याला निलंबित केलं पाहिजे अशीही मागणी केली आहे. ज्या लोकांनी आदिवासींच्या जमिनी हडपल्या आहे त्यांच्याशी जमिनी घेऊन परत आदिवासींना देण्यात यावी. ह्या मागण्या मान्य नाही केल्या तर आदिवासी समाज व आमच्या सारखे सामाजिक कार्यकर्ते मिळून रस्त्यावरती उतरून संघर्ष करू आणि या सरकार ला खाली खेचू असे भूषण मधुकरराव फुसे म्हणाले.
आदिवासी समन्वय समिती द्वारे राजुरा, कोरपना, गोंडपिपरी व जिवती तालुक्यातील अनुसूचित क्षेत्रातील व इतर सर्व आदिवासी बहुसंख्य असलेल्या ग्रामपंचायती गाव, खेडे, गुडे, टोले व पाडे यातील सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य, तथा आदिवासी विवीध कार्यकारी सहकारी संस्था, आदिवासी शिक्षण संस्था, आदिवासी विदयार्थी - विदयार्थीनी, शेतकरी व शेतमजुर वर्तमान काळातील सत्ताधारी पक्षातील आदिवासी नेते व कार्यकर्ते तसेच विरोधी पक्षातील आदिवासी नेते व कार्यकर्ते तसेच स्थानिक सत्ता पक्षातील आमदार व माजी आमदार तसेच वर्तमान काळात निवडणुकीत नामनिर्देषीत असणारे गैरआदिवासी व आदिवासी यांनी खालील आदिवासी समाजाच्या मुदयांवर आपली भुमिका स्पष्ट करण्याकरिता एक दिवसीय तालुका निहाय धरणे आंदोलन करण्यात आले आहे.
ह्या आहेत मागण्या
- परिपत्रक क्रमांक एसटीसी- 1009/प्रक्र 164/का 10 दिनांक 12 एप्रिल 2010 या मधील अनुसूचित जमातीची खोटी जात प्रमानपत्रे देणाऱ्या व घेणाऱ्या विरुद्ध दाखल केलेल्या फौजदारी गुन्हयाचा परिपत्रक पुर्वरत ठेवण्याबाबत.
- शासन परिपत्रक क्रमांक एसटीसी-2122/प्रक्र 242(1)/का 10 दिनांक 12 जुलै 2024 अनुसूचित जमातीची खोटी जात प्रमानपत्रे देणाऱ्या व घेणाऱ्या विरुध्द फौजदारी गुन्हे दाखल केलेल्यावर संरक्षण देणारे परिपत्रक रदद करणेबाबत.
- 1 ऑगस्ट 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाने आदिवासी प्रवर्गातील अ,ब,क,ड वर्गवारी व नॉन क्रिमीलेअर निर्णयाची राज्य सरकारला अधिकार देण्यात आले आहे. त्याची अंमलबजावणी राज्य शासनाने करू नये.
- 50% पेक्षा अधिक आदिवासी लोकसंख्या असलेले गाव, पाडे, गुडे, वाडी, वस्ती, (सन 2011 च्या जनगणनेप्रमाणे) पेसा अंतर्गत समाविष्ठ करण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करणे.
- आदिवासी मुलींनी गैर आदिवासी मुलांशी लग्न करुन जंगम व स्थावर मालमत्ता खरेदी-विक्री करण्याकरिता प्रतिबंधीत करुन राजकीय व शासकीय लाभ घेणाऱ्या लाभार्थ्या विरुद्ध प्रतिबंधीत कायदा तयार करणे.
- वनहक्काचे प्रलंबीत दावे तातडीने निकाली लावण्याबाबत.
- महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक ग्राम विकास विभाग दिनांक 25/07/2024 चे परिपत्रक रद्द करण्याबाबत.
- पेसा अनुसूचित क्षेत्रातील सेवानिवृत्त शिक्षकाला न घेता शिक्षक पदावर निवड झालेल्या पात्र उमेदवाराला नियुक्त करण्याबाबत किंवा डि.एड.बि.एड. उत्तीर्ण विदयार्थी घेण्यात यावे.
- महाराष्ट्रराज्यातील 13 जिल्हात पेसा अंतरर्गत 17 संवर्गच्या पदभर्ती करता आदिवासी आयुक्त नाशिक यांचे कार्यालया समोर धरणे/बेमुद्दत विदयार्थी- विदयार्थीनी मागण्याची पुर्णता करण्याबाबत आंदोलन करण्यात येत आहे.
यावेळी आदिवासी समाजाचे प्रभाकर गेडाम कोरपना, भारत आत्राम नांदा-बिबी, गजानन जुमनाके जिवती, प्रा.लक्ष्मण मंगाम जिवती, सामाजिक कार्य करते BEE,MBA,LLB, भूषण मधुकरराव फुसे, शामराव गेडाम नगरसेवक जिवती, प्रेमदास मेश्राम, केशव कुमरे, विजय गोदरु पाटील जुमनाके, भीमराव आनंदराव कन्नाके, विलास मडावी, अनिता तुकाराम धुर्वे, संतोष भीमराव सलाम, शंकर बीरशाव चिकाम, मनोहर आत्राम, साईनाथ कन्नाके, आकाश गेडाम, स्वप्नील गेडाम, देविदास सिडाम व शेकडो समाज बांधव उपस्थित होते.
✊ महिलांनी आत्मनिर्भर होत कार्य करावे - भूषण मधुकरराव फुसे
✊ महिलांनी आत्मनिर्भर होत कार्य करावे - भूषण मधुकरराव फुसे
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #kavthala #nagbhid #jiwati #bhari #patan #shedwahi #babapur #shankarpathar #jiwati #jiwatitahasil #nagrala #farmer #gondpipari #BhushanMadhukarraoPhuse #BhushanMadhukarraoFuse #BhushanPhuse #BhushanFuse #aadiwasi #aadiwasisamaj #Water #land #forest #Conspiracytoendreservation #Rajura #Korpana #Jivati #Gondpipari #Talukas #Dharnamovement #DharnaAandolan #BhushanFuse #GajananJumanake #PrabhakarGedam
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.