पोलिसांनी केल्या चोरट्याकडून अनेक दुचाकी जप्त
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; आरोपी अटकेत
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. १० ऑगस्ट २०२४) -
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शुक्रवारी रात्रीच्या सुमारास गस्तीवार असताना विविध स्वरुपातील गुन्हे दाखल असलेल्या सुमोहित उर्फ गोलू हा विना कागदपत्राची दुचाकी एमएच २९ एएक्स ०३४९ ची विक्री करण्याच्या उद्देशाने चोर खिडकीजवळ संशयास्पद फिरत असल्याची माहिती मिळाली होती. पथकाने घटनास्थळी जाऊन त्याला ताब्यात घेत दुचाकीच्या कागदपत्राची विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. चोरीची मोटार सायकल विक्री करण्याच्या प्रयत्नात असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन झडती घेतली असता चोरट्याने दुचाकी चोरीची कबुली दिली. यावेळी आरोपीकडून चार दुचाकी जप्त करण्यात आले आहे. तसेच इतर ठिकाणांवरून दुचाकी चोरीच्या घटनांबाबत चौकशी केली असता त्याने पाच दिवसांपूर्वी रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बजाज पल्सर, एक दिवसापूर्वी भद्रावती परिसरातून हिरोहोंडा स्पेंडर आणि बाबुपेठ परिसरातून एक मोपेड चोरल्याची कबुली दिली. या चोरीच्या दुचाकी चोरखिडकीजवळील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या पार्किंगमध्ये ठेवल्याची माहिती दिली. या माहिती वरून पोलिसांनी चोरीच्या चारही दुचाकी जप्त केल्या. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच सदर दुचाकी ही चार दिवसांपूर्वी अयप्पा मंदिर तुकूम, चंद्रपूर येथून पोहेकर जीमजवळून चोरल्याची कबुली दिली. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असूने, त्याच्याकडून १ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज गदादे, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, पोहवा दिपक डोंगरे, नापोकों संतोष येलपूलवार, पो.कॉ. नितीन रायपुरे, गोपाल आतकुलवार, गोपीनाथ नरोटे, अमोल सावे, उमेश रोडे यांनी केली असुन पुढील तपास पो.स्टे. रामनगर येथील पोलीस करीत आहे.
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari #ballarshah #chimur #bikethief #crimebranch#localcrimebranch #burglarwindow #chorkhidaki #Bhadravati #BajajPulsar #HeroHondaSpender #policestationramnagar #babupeth #AyyappaTempleTukumChandrapur
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.