Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: कोरची तेथे लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वैद्यकीय अधिकाऱ्यास अटक आमचा विदर्भ - दीपक शर्मा गडचिरोली (दि. १० ऑगस्ट २०२४) -         कोरची ग्रामीण रुग्णालयातील १०८ रुग्णवाहिकेवर कार्यरत...

वैद्यकीय अधिकाऱ्यास अटक
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
गडचिरोली (दि. १० ऑगस्ट २०२४) -
        कोरची ग्रामीण रुग्णालयातील १०८ रुग्णवाहिकेवर कार्यरत असलेल्या डॉक्टरला लैंगिक शोषण प्रकरणी गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे. आतिश पंकज सरकार (वय २६, रा. कोरची) असे आरोपीचे नाव आहे.

        आरोपी आतिश सरकार याने पीडित २२ वर्षीय युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पीडित युवतीने त्याला लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने लग्न करण्यास नकार दिला. युवतीकडील मंडळींनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो मानण्यास तयार नव्हता. शेवटी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्याशिवाय पीडित युवतीकडे पर्याय नव्हता.

        तक्रारीवरून आतिशच्या विरोधात गडचिरोली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्याला ८ ऑगस्ट रोजी अटक करून त्याच दिवशी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आतिशला अटक झाल्याने वैद्यकीय एकच खळबळ माजली आहे.

#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari #ballarshah #chimur #gadchiroli #korachi #medicalofficer #sexualabuse #RuralHospital #GadchiroliPoliceStation #108ambulance #victimgirl

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top