Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: मोबाईल ॲप ने घडलेली मैत्री पडली महागात
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मारझोड करत ६७ हजार लुटले तीन आरोपींना अटक आमचा विदर्भ - राजेश अरोरा, प्रतिनिधी बल्लारपूर (दि. १० ऑगस्ट २०२४) -         एका युवकाला मोबाईल ॲप...
मारझोड करत ६७ हजार लुटले
तीन आरोपींना अटक
आमचा विदर्भ - राजेश अरोरा, प्रतिनिधी
बल्लारपूर (दि. १० ऑगस्ट २०२४) -
        एका युवकाला मोबाईल ॲप ने मैत्री करणे महागात पडले. त्या मैत्री वरून त्या युवकाला तिघांनी मारपीट करून लुटल्याची घटना ९ ऑगस्ट ला दुपारी १२ वाजता घडली. त्या तिन्ही आरोपींना पोलीसांनी १२ तासात अटक केले आहे.

        विसापुर येथील युवक प्रशांत मनोहर हुलके याने मोबाईल वरून ग्रिंडर ॲप डाऊनलोड केले. त्यात त्याला मैत्री करण्याची विनंती आली. त्याने ते मान्य करून मैत्री केली. त्याला बल्लारपूर येथे बीटीएस प्लॉट परिसरात मिळण्यास बोलाविले. प्रशांत ने आपली मोटर सायकल बस स्टँड येथे ठेवून तो पैदल जुना बस स्टँड गांधी कॉम्प्लेक्स येथे त्या मित्रास मिळाला. तेथून ते पैदल गोरक्षण वार्डातील एका गल्ली मध्ये बसून गोष्टी करत असता तिथे दोन युवक येऊन तुम्ही चोरी करण्यास आले म्हणून प्रशांत हुलके यास मारहाण करत त्याचा मोबाईल हिसकवून त्याच्या मोबाईलतून युपीआय द्वारे ५६ हजार ३०० रुपये  हस्तांतरण केले तसेच त्याच्या जवळील ६०० रुपये व मोबाईल असा एकूण ६६ हजार ९०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. प्रशांत हुलके यांनी त्याची तक्रार बल्लारपूर ठाण्यात केली.

         नुकतेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांनी एक टीम तयार करून आरोपीचे शोध घेण्याचे सूचना दिले. डी.बी. पथकातील अधिकारी आणि  पोलीस अमलदारानी शोध घेत साईबाबा वॉर्ड बल्लारपूर निवासी जुबेर हुसैन याचे ताब्यातुन नगदी ८ हजार रु. रोख व फिर्यादीचा चोरीस गेलेला मोबाईल, ईकरीमा शेख यांचे ताब्यातुन नगदी ९ हजार ९०० रु. रोख व आंबेडकर वॉर्ड, बल्लारपूर निवासी करण तुळसीदास जिवणे यांचेकडून त्याचा गुन्हयात वापरलेला ज्यावर आरोपीने फिर्यादीचे मोबाईल मधील कि.५१ हजार रु. ट्रॉन्सफर केले होते तो मोबाईल कि.अं.१० हजार रु. असा एकुण-३७ हजार ९०० रु. मुद्देमाल जप्त केले.

        सदरची कारवाई पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी दिपक साखरे राजुरा यांचे मार्गदर्शनात पो.नि.सुनिल वि.गाडे, स.पो.नि. दिपक कांक्रेडवार, सफौ. गजानन डोईफोडे, पोहवा. सुनिल कामटकर, पोहवा. संतोष दंडेवार, पोहवा. रणविजय ठाकुर, पोहवा. पुरुषोत्तम चिकाटे, पोहवा.सत्यवान कोटनाके, वशिष्ठ रंगारी, शरदचंद्र कारुष, मिलींद आत्राम, शेखर माथनकर, श्रिनिवास वाभिटकर, हितेश लांडगे इ. स्टॉफ यांनी केली आहे.

#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari #ballarshah #chimur #MobileApp #ballarpurpolicestation #assault #Visapur #Grindrappdownload #Grabbingthemobilephone #crime #friendship #PoliceInspector #SuperintendentofPolice #AdditionalSuperintendentofPolice #SubDivisionalPoliceOfficer

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top