Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: स्वित्झरलँड ची मुलगी राजुरा तालुक्यातील पोवनी गावाची झाली सून
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कोंड्रासिना कुटुंबातील डायना झाली फुलझले कुटुंबाची सून महाराष्ट्रीयन परंपरेचे स्वित्झरलँड येथून आलेल्या पाहुण्यांनी केले कौतुक आमचा विदर्भ -...

कोंड्रासिना कुटुंबातील डायना झाली फुलझले कुटुंबाची सून
महाराष्ट्रीयन परंपरेचे स्वित्झरलँड येथून आलेल्या पाहुण्यांनी केले कौतुक
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. १० ऑगस्ट २०२४) -
        राजुरा तालुक्यातील पोवनी या लहानशा मात्र सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न गावाने नुकताच एक ऐतिहासिक क्षण अनुभवला आहे. पवनी गावातील फुलझले कुटुंबातील चि. मिनल यांचा विवाह स्वीझरलंडमधील प्रतिष्ठित कोंड्रासिना कुटुंबातील कु. डायना हिच्यासोबत मोठ्या धामधुमीत पार पडला. हा आंतरराष्ट्रीय विवाह सोहळा गावातील सर्वांसाठी कौतुकाचा विषय ठरला आहे, कारण डायना आता पवनी गावाची सून बनली आहे.

        विवाह सोहळ्याच्या दिवशी गावातील वातावरण अगदी उत्साहाने भारावले होते. विवाहस्थळ सुंदर फुलांनी आणि प्रकाशाने सजवले होते. पवनी गावाच्या पारंपारिक चालीरीतींना जागवत या विवाह सोहळ्यात स्थानिक परंपरांचीही ओळख करून देण्यात आली. ज्यामुळे डायनाच्या कुटुंबासाठी हा एक अनोखा आणि संस्मरणीय अनुभव ठरला.

        विवाह सोहळ्यानंतर, गावात एक विशेष जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. नवविवाहित दाम्पत्याला शुभेच्छा देण्यासाठी गावकऱ्यांनी गर्दी केली होती. फुलझले कुटुंबाने डायनाचे स्वागत पारंपारिक पद्धतीने केले, आणि महाराष्ट्रीयन परंपरेचे दर्शन घडवले. यामुळे डायनाला आणि तिच्या कुटुंबीयांना आपुलकीची भावना निर्माण झाली आहे. पोवनी गावातील या विवाह सोहळ्यामुळे गावकऱ्यांमध्ये आनंद आणि उत्साहाची लाट उसळली आहे. आंतरराष्ट्रीय विवाहाच्या निमित्ताने गावकऱ्यांनी सांस्कृतिक परंपरेचा अभिमान व्यक्त केला. 

        या विवाह सोहळ्यात माजी आमदार सुदर्शन निमकर, शेतकरी शेतमजूर व प्रकल्पग्रस्तांसाठी संघर्ष करणारे भाजपा कार्यकर्ता अँड. इंजि. प्रशांत घरोटे, पोवनी येथील उपसरपंच सरला विजय फुलझले, माजी सरपंच सुरेश झाडे, सुधाकर चंदनखेडे गुरुजी, प्रदीप बोबडे आणि इतर आमंत्रित पाहुणे उपस्थित होते.

#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari #ballarshah #chimur #india #switzerland #dianakondrasina #minalfuljhale #InternationalMarriage #PrashantGharote #sudarshannimkar #rajurataluka #pouni #village  #Asubjectofpraise #Maharashtriantradition

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top