आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि.१० ऑगस्ट २०२४)
राजुरा वन परीक्षेत्र अंतर्गत होणाऱ्या वन गुन्ह्यावर आळा घालण्याकरिता मध्य चांदा वनविभाग उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू यांनी नुकतीच राजुरा येथे बैठक घेत वन विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना अवैध वृक्षतोड, अवैध वाहतूक तसेच वन्य प्राण्यांच्या शिकारीवर आळा बसविण्याकरिता रात्रपाळी व दिवस पाळी नियमित गस्त करून कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.
राजुरा येथे नव्याने रुजू झालेले उपविभागीय वनाधिकारी पवन कुमार जोंग यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्राधिकारी सुरेश डी. येलकेवाड यांनी विविध पथक तयार करून राजुरा परिक्षेत्रातील सर्व संशयित ठिकाणी वन गुन्ह्यावर आळा घालण्याकरिता दिवसपाळी व रात्रपाळी पथकाद्वारे मागील दोन दिवसात अवैधरित्या रेतीचा उपसा करून करत ट्रॅक्टर मध्ये भरून वाहतूक करणाऱ्या पाच ट्रॅक्टर मौक्यावर पकडून आरोपी विरुद्ध POR जारी केला आहे. वनविभागाच्या कारवाईने वन परिक्षेत्रातून अवैधरित्या वृक्षतोड, वाहतूक करणाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे..
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari #ballarshah #chimur #forest #MadhyaChandaForestDivision #ConservatorofForestShwetaBoddu #Illegallogging #Huntingofwildanimals #SubDivisionalForestOfficer #PawanKumarJong #ForestRangeOfficerSureshYelkevad #Illegalsandmining #ForestDepartmentaction
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.