चंद्रपुर (दि. 12 ऑगस्ट 2024) -
रस्त्यावरील गुन्हेगारी घटना आता रुग्णालयाच्या आवारातही घडत आहेत. असेच एक प्रकरण 9 ऑगस्टला उघडकीस आले, बहीण रुग्णालयात भरती असताना तिला बघण्यासाठी आलेल्या भावाला दोघांनी लुटले.
चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात सध्या लुटारू चोरांची दहशत पसरली आहे, रस्त्यावरील गुन्हेगारी आता रुग्णालय परिसरात आली आहे.
ऑगस्टला रात्री 9 वाजताच्या सुमारास 25 वर्षीय सुभाष मराठे हे बहिणीला बघण्यासाठी रुग्णालयात आले होते. सुभाष ला शौचास लागल्याने ते रुग्णालय परिसरात होते. त्यावेळी 2 मुले तोंडाला काळे दुपट्टे बांधून आले. त्यांनी सुभाष ला म्हटले की पैसे काढ अन्यथा तुझ्यापोटावर चाकू चा वार करणार. सुभाष ने जवळ पैसे नसल्याचे सांगितले मात्र त्या मुलांपैकी एकाने सुभाष ला मागून पकडले तर दुसऱ्याने त्याला पाठीवर व बरगड्यावर हात बुक्क्यांनी मारले.
दोघांनी जबरदस्तीने सुभाष च्या खिशातील रोख 11 हजार रुपये व बँकेचे पासबुक व मोबाईल काढून पळून गेले. अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे सुभाष घाबरला त्याने त्याच्यासोबत घडलेला प्रसंग कुणाला सांगितला नाही. मात्र सकाळी त्याने घडलेला सर्व प्रकार वडिलांना सांगितला. सकाळी सुभाष व त्याचे वडील शहर पोलीस ठाण्यात गेले व आपली तक्रार नोंदविली. पोलिसांनी कलम 309 (6), 3 (5) भारतीय न्याय संहिता अनव्ये गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला. रुग्णालय परिसरातील सीसीटीव्ही ची पाहणी करत गुप्तदाराच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी 28 वर्षीय शुभम उर्फ बाबू अमर समुद राहणार पंचशील चौक घुटकाला याला अटक केली.
पोलिसांनी आरोपी शुभम कडून मोबाईल, रोख 10 हजार, बँक पासबुक व गुन्ह्यात वापरलेला चाकू असा मुद्देमाल हस्तगत केला, सदर गुन्ह्यातील आरोपीचा साथादार व उर्वरित रोख रक्कमेचा पोलीस तपास करीत आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके, सपोनि मंगेश भोंगाळे, संतोष निंभोरकर, महेंद्र बेसरकर, सचिन बोरकर, निलेश मुडे, भावना रामटेके, संतोष पंडित, इम्रान खान, संतोष कावळे, दिलीप कुसराम, शाहबाज, रुपेश रणदिवे, रुपेश पराते, इर्शाद, मंगेश मालेकर, राहुल चिताडे यांनी केली.
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari #ballarshah #chimur #jilhasamanyarugnalay #districtgeneralhospital #crime
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.