७५ भद्रावती-वरोरा विधानसभा क्षेत्र
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. १२ ऑगस्ट २०२४) -
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवून शिवसेना-भाजपा-राका आघाडी सरकार महिलांमध्ये लोकप्रिय झाली आहे. चंद्रपूर जिल्हयातील वरोरा विधानसभा ७५ विधानसभा क्षेत्र शिवसेना पक्षाचे गड आहे. या विधानसभा क्षेत्रामध्ये मा.बाळासाहेब ठाकरे यांना माणनारा कट्टर हिंदुत्ववादी मतदार आहे. येथे शिवसेना पक्षाचे संघटन तसेच महिलांचे संघटन मजबुत असुन या क्षेत्रामध्ये कार्यकत्यांची खुप मोठी फळी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पासून आता या फळीला अधिक बळ मिळाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनाभिमुख योजना बघता शिवसेनेची तिकीट मिळावी याकरिता कार्यकर्ते फिल्डिंग लावत आहे. या क्षेत्राची शिवसेनेची उमेदवारी मिळावी करीता शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख मिनलताई आत्राम यांनी चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडेच मागणी केली आहे.
मिनलताई आत्राम ह्या आदीवासी समाजातून येत असून मागील ३० वर्षांपासून शिवसेना पक्षाचे काम एकनिष्ठतेने करत आहेत. कट्टर शिवसैनिक महिला कार्यकर्ती अशी त्यांची ओळख असून त्या भद्रावती नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष सुद्धा राहिल्या आहे. तब्बल तीन वेळा नगर सेवक निवडून येत त्या सध्या नगर सेवक आहेत. त्याचा कारकिर्दीत त्यांनी भद्रावती शहराचा सर्वांगीन विकास पक्षपात किंवा भेदभाव न करता सर्वाना सोबत घेवुन केला त्यामुळे विकास कामाच्या नावाने व शिवसेना पक्षामुळे त्यांची विशेष ओळख निर्माण झाली आहे.
या क्षेत्रामध्ये त्यांची चांगली पकड असून भद्रावती-वरोरा शहरामध्ये शिवसेना पक्षाच्या आंदोलनात त्यांनी विशेष भूमिका निभाविली आहे. विविध प्रकारचे कार्यक्रम घेऊन महिलांचे संघटन मजबूत करत महिलांचे मेळावे, सबळीकरण करण्यासाठी मदत केली. त्यांचा या क्षेत्रात दांडगा जनसंपर्क असून शिवसेना पक्षाने त्यांना शिवसेना जिल्हा प्रमुख महिला आघाडी चंद्रपूर या पदाची जबाबदारी दिली असुन यामुळे पक्षाचे कार्यक्रम घेणे असे उपक्रम सातत्याने त्या राबवित आहे.
वरोरा-भद्रावती विधानसभा ७५ या क्षेत्रातील संपूर्ण आदिवासी समाज त्यांच्या सोबतीला असून त्या आदिवासी समाजाच्या विदर्भ अध्यक्ष महिला या पदावर सुद्धा आहे. अनुसूचित जाती, जनजाती तसेच ओबीसी व ईतर समाज त्यांच्या सोबत असून सर्व जनतेचा विशेषकर महिलांचा त्यांना पाठींबा आहे. ३० वर्षापासुन पक्षात केलेल्या कामाची दखल घेत त्यांच्या कामाची पावती म्हणून वरोरा विधानसभा ७५ ची उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख मिनलताई आत्राम यांनी मा. एकनाथ शिंदे साहेब यांच्या कडे केली आहे.
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari #ballarshah #chimur #bhadravati #warora #shivsena #eknathshinde #chiefminister #75BhadravatiWaroraAssemblyConstituency #ShivSenaDistrictChiefMahilaAghadiChandrapur #MinaltaiAtram #Exmayor #majinagaradhyksha #nagarsevak #Candidacy
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.