आमचा विदर्भ - अनंता गोखरे
चंद्रपूर (दि. 04 ऑगस्ट 2024) -
जिल्ह्यात साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. डेंगू, चिकनगुण्यांच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. जुलै महिन्यात 72 तर मागील सहा महिन्यात डेंगूचे 175 रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी एकाच्या मृत्यू झाला तर चिकुनगुनियाचे सहा रुग्ण आढळून आले आहेत. डेंग्यू व चिकनगुनिया रोग हा संग्रह संक्रमित एडिस इजिप्ती डासा द्वारे पसरतो. आधीच विषाणूची लागण झालेल्या एखाद्याला डास चावल्यावर त्या संक्रमित डासाद्वारे इतर मानवामध्ये याचे विषाणू पसरतात. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा डेंगू च्या रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली दिसून येत आहे. मागील सहा महिन्यात जिल्ह्यात डेंगूसदृश्य 1708 रुग्णांचे नमुने घेण्यात आले. त्यापैकी 1075 नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. त्यापैकी एकाच्या मृत्यू झाला आहे तर चिकुनगुण या संशयित 728 नमुने घेण्यात आले. त्यापैकी सहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे वेळीच अंग दुखी, ताप, खोकला अशी लक्षणे दिसल्यास डॉक्टरांना दाखवावे असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
अशी आहेत आजाराची लक्षणे
डेंगू मध्ये थंडी वाजून ताप येणे, तीव्र डोके दुखी, डोळ्यांमध्ये वेदना, स्नायू आणि सांधेदुखी, मळमळ, उलट्या, ग्रंथींना सूज येणे, रेशेस अशी लक्षणे दिसून येताच तपासणी करून घ्यावी. चिकनगुनिया ची लक्षणे साधारणपणे संक्रमित डास चालल्यानंतर चार ते आठ दिवसांनी सुरू होतात. ताप, सांधेदुखी, स्नायू वेदना, डोकेदुखी, थकवा आणि लक्षणे दिसून येतात सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे दिसून आल्यास डॉक्टरांना दाखवून वेळीच रक्त तपासणी करून उपचार करून घ्यावा.
कोणत्या महिन्यात किती रुग्ण?
जानेवारी महिन्यात जिल्ह्यात एकूण आठ रुग्णांची नोंद करण्यात आली. फेब्रुवारी महिन्यात आठ तर मार्चमध्ये 23 अशी डेंगू रुग्णांची नोंद झाली. एप्रिल 22, मे 21, जून 21 आणि जुलैमध्ये एकूण 72 रुग्णांची नोंद झालेली आहे. जुलै महिन्यात डेंगूच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
पावसाळ्यात डासांची उत्पत्ती होत असल्याने डेंगू, चुकून गुनिया होण्याची शक्यता असते. त्यामुळे घरासमोरील परिसर स्वच्छ ठेवावा, पाण्याचे डपके सापटे करावे, कोरडा दिवस पाळावा, घरातील खिडक्यांना जाड्या बसवाव्या, झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा, सोबतच ताप, अंग दुखी, सर्दी, खोकला झाल्यास अंगावर न काढता लगेच तज्ञ डॉक्टरांना दाखवून उपचार करून घ्यावे असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी प्रकाश साठे यांनी केले आहे.
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #ballarpur #Dengue #Chikungunya #patient #Aedesaegyptimosquito #mosquito #Doctor #hospital #death #positive #nigative #HealthDepartment #Breedingofosquitoesduringrainyseason
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.