आमचा विदर्भ - राजेश अरोरा, प्रतिनिधी
बल्लारपूर (दि. ०४ ऑगस्ट २०२४) -
बल्लारपुरातील पेट्रोल बॉम्ब प्रकरणातील मुख्य आरोपी मास्टर माईंड सूरज गुप्ता याला बल्लारपूर पोलिसांनी नागपुरातून शनिवारी (दि. 3) अटक केली. 7 जुलै रोजी बल्लारपूर येथील मालू वस्त्र भंडार या कापड दुकानदार व्यावसायीकावर अज्ञात आरोपींनी पेट्रोल बॉम्बच्या साहाय्याने हल्ला केला होता. हल्ला करून आरोपी पसार झाले होत.. सूरज गुप्ता, असे अटक करण्यात मुख्य आरोपीचे नाव आहे. घटनेचे गांभिर्य ओळखून पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू यांनी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर, बल्लारपूर पोलिस स्टेशन यांचे वेगवेगळे पथके तयार करून आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना केले होते. त्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुभम दुबे व सम्राट उर्फ विपीन उर्फ डॉक्टर चौधरी या दोन आरोपींना जबलपूर मध्यप्रदेश येथून ताब्यात घेऊन अटक केली होती. तर बल्लारपूर पोलिसांनी नागपुरातून निरज गुप्ता, सागर शर्मा याला नागपुरातून तर सचिन देरकर, संतोष गुप्ता यास बल्लारपूरमधून अटक केली होती. यात मुख्य आरोपी मास्टर माइंड सूरज गुप्ता हा मागील दीड वर्षापासून फरार होता. त्याचा मागावर बल्लारपूर पोलिस होती. अखेर शनिवारी पोलिस निरीक्षक आसिफ राजा शेख यांनी सूरजचा मुसक्या आवळल्या. पोलिस निरीक्षकांना आरोपी नागपूर असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार ठाणेदारानी धरमपेठ नागपूर येथे सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळल्या. कारवाई पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू उपविभागीय पोलिस अधिकारी दीपक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गोविंद चाटे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक गजानन डोईफोडे, महिला सिपाही मेघा आंबेकर, कल्याणी पाटील यांनी पार पाडली.
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #ballarpur #MaluReadymade #firing #petrolbomb #gandhichauk #policestationballarpur #petrolbombattack #nagpurpolice #jabalpurpolice #Professionalrogue #CrimeBranch #Manewada #Panchpavalipolicestation #clothmerchant #orangecity #NagpurPolice #surajgupta #ballarpurpolicestation #ballarshah
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.