Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांच्या मागणीकरिता गट शिक्षणाधिकाऱ्याला निवेदन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शाळेला शिक्षक द्या हो शिक्षक  जिप शाळेला दोन वर्षांपासून शिक्षकांची प्रतीक्षा जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांच्या मागणीकरिता गट शिक्षणाधिकाऱ्याल...

शाळेला शिक्षक द्या हो शिक्षक 
जिप शाळेला दोन वर्षांपासून शिक्षकांची प्रतीक्षा
जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांच्या मागणीकरिता गट शिक्षणाधिकाऱ्याला निवेदन
आमचा विदर्भ - अविनाश रामटेके, प्रतिनिधी
विरूर स्टेशन (दि. ५ ऑगस्ट २०२४) -
        विरूर स्टेशन येथील जिल्हा परिषद तेलुगू शाळेकरिता शिक्षकांच्या मागण्यांबाबत शाऴा व्यवस्थापन समिती व पालकांनी गट शिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले आहे. जिल्हा परिषदेच्या विरूर केंद्रात एकमेव तेलुगू भाषेची शाळा आहे. दोन वर्षांपूर्वी या शाळेत केवळ दोनच विद्यार्थी होते. मात्र ग्रामस्थांच्या प्रयत्नाने पालकांनी इंग्रजी कॉन्व्हेंट शाऴेतील आपल्या मुलानां जिल्हा परिषदेच्या तेलुगू शाळेत प्रवेश मिळवून दिला. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थी संख्या आता 2 वरून 85 च्या जवळ पास आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून काढून सरकारी शाळांमध्ये प्रवेश मिळूनही शिक्षकांची कमतरता शासनाच्या उणिवा अधोरेखित करत असल्याचे दिसून येत आहे. 

        गत दोन वर्षांपासून शाळेत दोन 2 शिक्षकांची कमतरता असून या संदर्भात पालकांनी लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी यांना वेळोवेळी निवेदन दिलेले असतांना सुद्धा शाळेत शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. एकीकडे शासन ''बेटी पढाओ, बेटी बचाव'' अभियान राबवत असताना सुद्धा शिक्षणासारख्या मूलभूत समस्येकडे शासनाचे दुर्लक्ष होत असून शिक्षकच नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. गटशिक्षणाधिकारी यांनी दोन दिवसात दोन शिक्षक शाळेत नियुक्ती करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान बघता तात्काळ शिक्षकांची नेमणूक न  झाल्यास शाळेला कुलुपबंद करून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा शाऴा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोनुसिंग टांक सह पालक जगतसिंग वधावन, ललितकुमार सोनी यांनी प्रशासनाला दिला आहे.

#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #ballarpur #education #zpschool #RajuraAssemblyConstituency #statement #Teacher #students #TeluguSchool #Englishmediumschools #People'sRepresentative #Collector #EducationOfficer #betipadhaobetibachao #EducationManagementCommittee #schoolisonlockdown #Indefinitehungerstrike #Government'sneglectofbasicissueslikeeducation #wirurstation #rajura

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top