Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: राजुरा विधानसभा क्षेत्रात रस्ते, पुलांची दैनावस्था
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
रस्त्यासोबतच पूलही उखडला आमचा विदर्भ - दीपक शर्मा  राजुरा (दि. ५ ऑगस्ट २०२४) -         राजुरा तालुक्यातील तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या लक्कडक...

रस्त्यासोबतच पूलही उखडला
आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
राजुरा (दि. ५ ऑगस्ट २०२४) -
        राजुरा तालुक्यातील तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या लक्कडकोट परिसरातील कोष्टाळा कडे जाणाऱ्या रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. थेट तेलंगणा सीमेलगतच्या कोष्टाळा परिसरात पाच घोट्टे आहेत. बारीकराव घोट्टा पासुन ते हनुमान घोट्टा जायच्या मार्गावर ग्रामस्थांना जाणे येण्याकरिता तारेवरची कसरत करावी लागत आहे. वर्षानुवर्षे या रस्त्यांची साधी डागडुजी देखील झालेली नाही. स्थानीक प्रशासनाला व लोक प्रतिनिधींना या भयानक वास्तव्याची जाणीव असून देखील याबाबत त्यांच्याकडून काहीही उपाय किंवा तजवीज होतांना दिसत नाही. अशी येथील लोकांची खंत आहे. खडतर आणि खाचखळग्यांच्या रस्त्यावरून नागरिक, वृद्ध, रुग्ण व महिला तसेच शाळकरी विद्यार्थी प्रवास करतात. कधीतरी शासनाला जाग येऊन ते रस्ता करतील किंवा डागडुजी करतील या भोळ्या आशेवर येथील ग्रामस्थ जगत आहेत.

पूलही झाला धोकादायक.......
        गावाकडे जाणारा पूल खचला आहे. पुलावरील स्लॅपच अर्ध्याहून जास्त वाहून गेल्याने पुलावरून पाणी वाहत असताना एखाद्या वाहनचालकाने अवधानाने वाहन पुलावरून नेल्याच्या प्रयत्न केल्याने येथे अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. संबंधित विभागाने गंभीरतेने रस्ता व पुलाचे बांधकाम करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #ballarpur #wirurstation #rajura #Poorconditionofroadsbridges #bridgecollapsed #RajuraTaluka #TelanganaBorder #Koshtala #Lakkadkot #RajuraAssemblyConstituency

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top