Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: अपघातग्रस्त युवकांकरिता देवदूतासारखे धावले हितेश चव्हाण!
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कोरपना तालुक्यातील सोनुर्ली-आसन रस्त्यावरील घटना हितेश चव्हाणच्या समयसूचकतेने अपघातग्रस्ताला मिळाले वेळेत उपचार आमचा विदर्भ - दीपक शर्मा कोर...

कोरपना तालुक्यातील सोनुर्ली-आसन रस्त्यावरील घटना
हितेश चव्हाणच्या समयसूचकतेने अपघातग्रस्ताला मिळाले वेळेत उपचार
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
कोरपना (दि. 07 जुलै 2024) -
       कोरपना तालुक्यातील सोनुर्ली-आसन मार्गावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका ट्रकला मागून दुचाकीस्वार येऊन थडकले व खाली पडले. दुचाकीवर दोघे जण स्वार होते व दोघांना गंभीर दुखापत झाली होती, अपघातस्थळी शेकडो लोकही होते. काही अंतराने भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी चंद्रपूर जिल्हाध्यक्ष हितेश आबाजी चव्हाण कामानिमित्य कोरपना कडे जात असताना त्यांना रस्त्यावर जमा झालेली गर्दी दिसली तत्काळ कार थांबवत त्यांनी दोन्ही जखमींना बघितले 108 नंबर वर कॉल करून ते एम्बुलन्स मागावू शकले असते मात्र हितेश चव्हाण देवदूतासारखे धाऊन गेले. त्यांनी त्यांचे आसन येथील सोबती व भाजप नेते प्रमोद पायघन तसेच गडचांदूर येथील भाजपा कार्यकर्ता सत्यदेव शर्मा यांच्या साहाय्याने दोघ्या जखमींना स्वतःच्या कार मध्ये उपचाराकरिता गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालय येथे आणत भरती केले. अपघातग्रस्तांचे नाव शिवाजी नरवळ व कृष्णा नरवड असल्याचे सांगण्यात येत आहे. गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार झाल्यानंतर दोन्ही अपघातग्रस्तांना समोरच्या उपचाराकरिता चंद्रपूर रेफर करून दिले. 

        हितेश चव्हाण व त्यांच्या साथीदारांनी दाखविलेल्या समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला आणि जखमी शिवाजी नरवळ व कृष्णा नरवड यांचा आता उपचार सुरू झाला आहे. 'देव तारी त्याला कोण मारी' या उक्तीनुसार हितेश चव्हाण जखमी दोन्ही नरवड करिता देवदूतासारखे धावून गेले. म्हणून परीसरातील नागरिक आणि जखमीच्या नातेवाईकांनी त्यांचे आभार मानले आहे.

#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #accident #devdoot #Sonurli-AsanRoad #truck #bike #108call #Ambulance #KorpanaTalukaSonurliAsanroad #GadchandurRuralHospitals #BharatiyaJanataPartyBhatkeVimuktAghadi #jilhadhyksha #HiteshChavan #'Godstarwhokilledhim'

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top